सनातनच्या ७७ व्या संत पू. सत्यवती दळवीआजी यांच्या देहत्यागाच्या वेळी आणि देहत्यागानंतर स्थुलातून, तसेच सूक्ष्मातून साधिकेला जाणवलेली सूत्रे

सनातनच्या संत पू. (श्रीमती) सत्यवती दळवी (वय ८३ वर्षे) यांनी २७.२.२०१९ या दिवशी सायंकाळी ७.५५ वाजता देवद येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

मुलीने पूर्णवेळ साधना करण्याच्या संदर्भात वडिलांचे मुलीला व्यावहारिक दृष्टीने समजावणे आणि मुलीचे आध्यात्मिक दृष्टीने समजावणे

दैवी बालकांमध्ये साधना करण्याची तळमळ उपजत असते. त्यामुळे ती व्यावहारिक जीवनात रमत नाहीत. लहान वयात पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ‘देवच काळजी घेईल’, अशी त्यांची श्रद्धा असते.

झोपतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय. प्रत्येकाची प्रकृती आणि तत्कालीन स्थिती यांनुसार आरामदायी स्थिती वेगवेगळी असू शकते.

आश्रमजीवनाची ओढ असणारी, धर्माभिमानी आणि निर्भिड असणारी पळ्ळुरुत्थी, केरळ येथील बालसाधिका कु. देवीनंदना हिने गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सनातनच्या कोची येथील साधिका श्रीमती सौदामिनी कैमल यांनी कु. देवीनंदना हिचा भेटवस्तू देऊन सत्कार केला.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणयात्रेचे (अंत्ययात्रेचे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून वातावरणात धर्मशक्तीचे प्रक्षेपण झाल्यावर पुष्परथाचे रूपांतर धर्मरथामध्ये झाले. त्यानंतर काही काळानंतर परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या पार्थिवातून वातावरणात निर्गुण चैतन्यलहरींचे प्रक्षेपण झाल्यावर धर्मरथाचे रूपांतर मोक्षरथामध्ये झाले.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या महानिर्वाणानंतर एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

साधकांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साक्षात प्रतिरूप असलेले, सनातनच्या प्रत्येक साधकांवर अपार प्रीतीचा वर्षाव करणारे ज्ञानयोगी आणि ऋषितुल्य परात्पर गुरु परशराम पांडे महाराज (वय ९१ वर्षे) यांनी ३ मार्च २०१९ या दिवशी सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात देहत्याग केला.

५७ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पेण (रायगड) येथील चि. वेदश्री दिवेकर (वय ५ वर्षे) !

चि. वेदश्री हिच्यातील प्रेमभावामुळे ती सगळ्यांना सहजतेने आपलेसे करून घेते. त्यामुळे तिची सगळ्यांशी लगेच जवळीक होते. घरात कुणी आजारी असल्यास ती त्यांची विचारपूस करते.

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या उत्तरक्रियेचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज यांच्या डोक्याजवळ लावलेल्या दिव्याचे सूक्ष्म परीक्षण

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. उत्कर्ष अभिनय लोटलीकर (वय ५ वर्षे) !

‘उत्कर्ष नेहमी हसतमुख असतो. त्याला सगळ्यांमध्ये मिसळायला आवडते. त्याच्या बोलण्यात गोडवा आहे. त्याचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते. तो लाघवी आहे. त्याच्या बोलण्याने अन्य त्याच्याकडे आकर्षित होतात.

परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या देहत्यागाचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु पांडेबाबा यांच्यावर पाताळातील अनेक बलाढ्य वाईट शक्ती आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होत्या; पण श्रीगणपतीने त्यांच्या आणि वास्तूभोवती निर्माण केलेल्या संरक्षककवचामुळे आक्रमणाचा केवळ २ – ३ टक्के परिणाम होत होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now