आचारसंहितेत पालट केला असल्यास निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे ! – उद्धव ठाकरे

अमित शहा यांनी मध्यप्रदेशात भाजपला निवडून दिल्यास श्री रामल्लाच्या दर्शनासाठी विनामूल्य नेण्याची घोषणा केली.

अन्यांच्या जातीविषयी द्वेष निर्माण करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात चालू झाले ! – राज ठाकरे

‘मनोज जरांगे पाटील यांना ‘असे कोणतेही आरक्षण कधीही मिळणार नाही’,निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असे जातीय तणाव का होत आहेत ? हे लवकरच पुढे येईल’,- राज ठाकरे .

Indian Army In Maldives: भारतीय सैनिकांना देश सोडावा लागेल !

नवे राष्ट्राध्यक्ष मोइज्जू यांनी इब्राहिम सालेह यांच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणाला मालदीवसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. मोइज्जू हे चीनधार्जिणे असल्याचे सांगितले जात आहे.

Colombia ‘junk food law’: जगात प्रथमच कोलंबिया देशाने बनवला ‘जंक फूड’ संदर्भात कायदा !

‘जंक फूड’मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे जगजाहीर असतांना आजही याकडे गांभीर्याने पाहिले न जाणे लज्जास्पद !

SC/ST Act, Madhya Pradesh High Court : कर्मचारी कक्षात जातीवाचक उल्लेख करणे गुन्हा नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालय

शाळेतील कर्मचारी कक्ष हे सर्वसामान्यांनी भेट देण्याचे ठिकाण नाही. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाण नाही. त्यामुळे तेथे जातीवाचक उल्लेख केला असेल, तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही.

५० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती लंडन येथे भारताकडे सुपुर्द !

भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या.

सियालकोट (पाकिस्तान) येथे लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्याची अज्ञातांकडून हत्या

सियालकोट येथे अज्ञातांकडून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला ठार मारण्यात आले आहे. महंमद मुजम्मिल असे या आतंकवाद्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबाशी सबंधित आहे.

जगाने भारताचे आभार मानले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी टीकाकारांना सुनावले

रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून तेल खरेदी केले, त्यामुळे जगालाच लाभ झाला. जर भारताने तेल खरेदी केले नसते, तर तेलाचा बाजार अस्थिर झाला असता आणि महागाईत वाढ झाली असती.

Freedom Of Expression Khalistan : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सहन करणे अत्यंत चुकीचे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

ब्रिटनचा ५ दिवसांचा दौरा आटोपून भारतात परतण्याआधी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका निश्‍चित दायित्वासह वापरले गेले पाहिजे.

Jaishankar reacts on Canada : भारतावर आरोप करतांना त्याविषयीचे पुरावेही द्यावेत, आम्ही अन्वेषण करू ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

भारत सरकार हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येची चौकशी करण्याची आवश्यकता नाकारत नाही; मात्र कॅनडाने या हत्येमध्ये भारतीय हस्तकाची  भूमिका असल्याचा आरोप केला असून या दाव्याचे समर्थन देण्यासाठी पुरावे सादर केले पाहिजेत.