खलिस्तानवाद्यांच्या कृत्यांवर परराष्ट्रमंत्र्यांचे ब्रिटन सरकारशी केलेल्या चर्चेत वक्तव्य
लंडन (इंग्लंड) – ब्रिटनचा ५ दिवसांचा दौरा आटोपून भारतात परतण्याआधी परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी पत्रकारांना संबोधित केले. ते म्हणाले की, भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे एका निश्चित दायित्वासह वापरले गेले पाहिजे. या स्वातंत्र्यांचा दुरुपयोग विशेषत: राजकीय उद्देशांनी प्रेरित दुरुपयोग सहन करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांनी हे मत ब्रिटीश नेत्यांसमोर मांडल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
डॉ. जयशंकर पुढे म्हणाले की,
१. ब्रिटनचे कॅबिनेट मंत्री आणि विरोधी पक्ष नेते यांच्याशी माझी वैश्विक अन् द्विपक्षीय सूत्रांवर व्यापक चर्चा झाली.
२. ब्रिटनचे गृहमंत्री जेम्स क्लेवरली आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार टिम बॅरो यांच्यासह बैठक झाली. या वेळी खलिस्तानवाद्यांच्या समर्थनार्थ चालू असलेल्या कृत्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय अधिकार्यांच्या संरक्षणाविषयी भारताने चिंता व्यक्त केली.
३. ब्रिटनचे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री डेव्हिड कॅमरन यांच्याशी रशिया-युक्रेन, तसेच इस्रायल-हमास यांच्यातील संघर्षावरही चर्चा झाली.
४. एकूणच पाहिले, तर माझा ब्रिटन दौरा योग्य वेळी झाला आहे. याची पुष्कळ आवश्यकता होती. अशा दौर्यांतूनच दोन्ही देशांमधील वास्तविक सामंजस्याला चांगली चालना मिळते. हा दौरा आमच्या संबंधांतील निकटतेचे एक उदाहरण होय.