पुणे येथे ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्कारांची घोषणा !

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी दिल्या जाणार्‍या ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘ॲम्फी थिएटर’मध्ये खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते होईल..

मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !

कु. पार्थ याने ‘अभ्यासासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला शिक्षणात यश प्राप्त झाले आहे’, असे सांगून श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

अमरावती येथे भारतमातेच्या चित्राच्या प्रथम पूजनाच्या मागणीसाठी सरपंचांना निवेदन !

‘ज्या भारतमातेने असंख्य अत्याचार सहन करत आपल्या राष्ट्रप्रेमींचे रक्षण केले, तिचे पूजन प्रथम व्हायला हवे’, या विचाराने श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या राष्ट्रप्रेमींनी याविषयी सरपंच वंदनाताई गवई यांना निवेदन दिले.

भारत आणि चीन यांचे सैनिक रशियात एकत्र सराव करणार

रशियामध्ये होणार्‍या ‘जागतिक सैनिक सरावा’त भारत आणि चीन यांचे सैनिक एकत्र सराव करतांना दिसणार आहेत. सध्या पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांमध्ये दोन वर्षांहून अधिक काळापासून तणावाची स्थिती आहे.

ही मुसलमानांच्या बापाची जागा नाही; शांततेत रहा अन्यथा पाकमध्ये चालते व्हा !  

भाजपचे स्थानिक आमदार आणि माजी मंत्री ईश्‍वरप्पा म्हणाले की, आम्हाला वाटेल तेथे आम्ही फलक लावू. ही जागा काही मुसलमानांच्या बापाची नाही. जर शांततेत रहायचे असेल, तर रहा आणि जे देशविरोधी आहेत त्यांनी पाकिस्तानात चालते व्हा.

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे निलंबित !

असे पोलीस असणे पोलीस दलाला लज्जास्पद ! यात आणखी कुणकुणाचा सहभाग आहे, याचीही चौकशी करून सत्य जनसमोर आले पाहिजे !

दोषींवर कठोर कारवाई करून नवी मुंबईतील सर्व चर्चच्या अंतर्गत असलेल्या वसतीगृहांची चौकशी करावी !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून आरोपींवर कारवाई का करत नाहीत ?

हरिहरेश्‍वर (रायगड) येथे सापडलेल्या नौकेचा आतंकवादाशी संबंध नाही !  

श्रीवर्धनमधील हरिहरेश्‍वर (रायगड) येथे स्थानिक मासेमारांना १६ मीटर लांबीची दुर्घटनाग्रस्त नौका आढळली. नौकेत एके ५६ बनावटीच्या ३ रायफली, दारूगोळा, तसेच कागदपत्रे आढळून आली.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्रादेशिक परिवाहन अधिकार्‍याकडे घातलेल्या धाडीमध्ये सापडली उत्पन्नापेक्षा ६५० पट अधिक संपत्ती !

एका अधिकार्‍याकडे इतकी संपत्ती सापडते, तर अन्य अधिकार्‍यांकडे किती संपत्ती असेल आणि देशातील सर्वच सरकारी अधिकार्‍यांची पडताळणी केली, तर किती बेहिशोबी संपत्ती मिळेल, याची कल्पनाच करता येत नाही !

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाविषयी चालू असलेली बहिष्काराची मोहीम योग्य ! – मुकेश खन्ना, अभिनेते

अभिनेते मुकेश खन्ना यांच्या या भूमिकेविषयी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री काही बोलतील का ?