अमरावती येथे भारतमातेच्या चित्राच्या प्रथम पूजनाच्या मागणीसाठी सरपंचांना निवेदन !

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती), १७ ऑगस्ट (वार्ता.) – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पूजनाच्या वेळी प्रथम अन्य प्रतिमांचे आणि शेवटी भारतमातेच्या चित्राचे पूजन केले जाते; परंतु ‘ज्या भारतमातेने असंख्य अत्याचार सहन करत आपल्या राष्ट्रप्रेमींचे रक्षण केले, तिचे पूजन प्रथम व्हायला हवे’, या विचाराने श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेच्या राष्ट्रप्रेमींनी याविषयी सरपंच वंदनाताई गवई यांना निवेदन दिले. या वेळी उपसरपंच श्री. अतुल दारोकार उपस्थित होते. निवेदन देण्यासाठी संस्थेचे संस्थापक, तसेच धर्मप्रेमी श्री. आकाश दाभाडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.