पुणे येथे ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्कारांची घोषणा !

देवर्षी नारद

पुणे – पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याविषयी दिल्या जाणार्‍या ‘देवर्षी नारद पत्रकारिता’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदानाचा कार्यक्रम २० ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘ॲम्फी थिएटर’मध्ये खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ‘विश्व संवाद केंद्रा’चे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यामध्ये ‘ज्येष्ठ पत्रकार पुरस्कारा’ने ‘लोकमत’चे विजय बाविस्कर, ‘टाईम्स ऑफ इंडिया’चे अभिजित अत्रे आणि ‘देशदूत’च्या वैशाली बालाजीवाले यांना सन्मानित करण्यात येणार आहे, तसेच ‘आश्वासक पत्रकार’, ‘व्यंगचित्रकार’ आणि ‘छायाचित्रकार’ यांनाही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. ‘विश्व संवाद केंद्र’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ यांच्या वतीने प्रतिवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. कोरोनामुळे गेली २ वर्षे पुरस्कार कार्यक्रम न झाल्याने २०२०, २०२१ आणि २०२२ या ३ वर्षांचे पुरस्कार एकत्र देण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली.