Pakistan’s Ultimatum Afghan Citizen : पाकिस्तानकडून अफगाणी नागरिकांना ३१ मार्चपर्यंत देश सोडण्याची चेतावणी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने सर्व अवैधरित्या परदेशी नागरिकांना परत त्यांच्या देशात पाठवण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून अफगाण नागरिकत्व कार्डधारकांना स्वेच्छेने पाकिस्तान सोडण्याची चेतावणी दिली आहे. त्यांच्यासाठी पाकने ३१ मार्च ही सममर्यादा निश्चित केला आहे.

इस्लामाबाद आणि रावळपिंडी येथे रहाणार्‍या या कार्डधारकांना अफगाणिस्तानात परत पाठवले जाईल. आतंकवादाच्या सूत्रावरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम ८ लाखांहून अधिक अफगाण निर्वासितांवर होऊ शकतो. या लोकांकडे अफगाण नागरिकत्व कार्ड आहे. हे सर्व जण निर्वासितांच्या श्रेणीत आहेत. सहस्रो लोकांनी कागदपत्रांविनाच पाकमध्ये आश्रय घेतला आहे.

संपादकीय भूमिका

भारतात रहाणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देश सोडण्याची चेतावणी भारत कधी देणार ? कि त्यांच्याकडील बनावट कागदपत्रांमुळे त्यांना भारतीय नागरिक समजले जाणार आहे ?