Mufti Shah Mir Shot Dead : पाकिस्तानमध्ये अज्ञाताकडून भारतविरोधी आतंकवाद्याची हत्या

आतंकवादी मुफ्ती शाह मीर

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्सचा) हस्तक मुफ्ती शाह मीर याची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.  तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या. यात तो जागीच ठार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी मारेकर्‍यांचा शोध चालू केला आहे. पाकने अटक केलेले  भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणातही मुफ्ती शाह मीर याचा हात होता, असे सांगितले जाते.

बलुचिस्तानमधील तुर्बत भागातील रहिवासी असलेला मुफ्ती शाह मीर आय.एस्.आय.च्या आदेशानुसार लोकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी अवैधरित्या नेण्याचा व्यवसाय करत होता. त्याआडून तो अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र यांची तस्करी करत असे. तो पाकिस्तानमध्ये चालणार्‍या आतंकवादी प्रशिक्षण केंद्रांनाही भेट देत होता. यासह तो पाकिस्तानातील आतंकवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास साहाय्य करत होता.