भारताच्या शस्त्रसंधी कराराच्या कथित उल्लंघनावरून पाकने भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला !

याला म्हणतात ‘चोराच्या उलट्या बोंबा !’

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतीय सैन्याकडून शस्त्रसंधी कराराचे कथितरित्या उल्लंघन केल्यावरून पाकने तेथील भारतीय राजकीय अधिकार्‍यांना जाब विचारला. पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचा आरोप आहे की, काश्मीरमधील नियंत्रणरेषेजवळील चिरीकोट सेक्टरमध्ये भारताने केलेल्या गोळीबारात पाकचे २ नागरिक घायाळ झाले.