कराड येथे शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्यासाठी ‘शिवतेज संघटने’च्या वतीने प्रशासनास निवेदन !

असे निवेदन का द्यावे लागते ? प्रशासन स्वतःहून कार्यवाही का करत नाही ?

पुण्यात भुयारी मार्गावर ‘मेट्रो’ची पहिली यशस्वी चाचणी !

येथील भूमीगत मेट्रोच्या पहिल्या ३ कि.मी. टप्पा असलेल्या मार्गावर ७ डिसेंबर या दिवशी पहिली चाचणी पार पडली. शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट या मार्गावर ही चाचणी पार पडली.

नागपूर येथे मद्याच्या नशेत मालवाहतूक बोलेरो चालकाने अनेकांना उडवले !

मद्याच्या नशेत चालकाने भरधाव मालवाहतूक बोलेरो वाहन चालवत भाजीबाजारात अनेकांना उडवले. यात घटनेत ५ भाजी विक्रेते घायाळ झाले आहेत, तर एक दुचाकीचालक २०० मीटर फरफटत गेला.

धारणी (जिल्हा अमरावती) येथे विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षक निलंबित !

असे अनैतिक वर्तन करणारे शिक्षक आदर्श विद्यार्थी काय घडवणार ?

जगदंब तलवार आणि वाघनखे वर्ष २०२४ च्या शिवराज्याभिषेकाला आणण्याचा प्रयत्न करणार ! – सुधीर मुनगंटीवर, सांस्कृतिक कार्यमंत्री

वर्ष २०२४ मध्ये होणार्‍या शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जगदंब तलवार आणि वाघनखे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.

जुळ्या बहिणींसमवेत विवाह केल्याच्या प्रकरणी युवकावर गुन्हा नोंद !

अकलूज (माळेवाडी) येथे २ डिसेंबर या दिवशी एका अतुल अवताडे या युवकाने जुळ्या बहिणींसमवेत विवाह केला. राहुल फुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अतुल यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला.

गडचिरोली येथे आंबाडीची भाजी खाल्ल्याने २२ विद्यार्थ्यांना उलट्या !

विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले असून वैद्यकीय पडताळणीनंतर यातील १८ विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तपालखीचे आगमन !

प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवगिरी संप्रदायाच्या दत्तजयंतीच्या निमित्ताने निघणार्‍या दत्तपालखीचे सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात सायंकाळी ७ वाजता शंखध्वनी आणि ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या नामघोषाच्या गजरात आगमन झाले.

महाराष्ट्राच्या गाड्या फोडणार्‍यांवर कर्नाटक सरकारने कारवाई करावी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागाचा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे याविषयी संयम पाळायला हवा. यावर तोडगा निघेल; परंतु सीमाभागात मराठी भाषिकांना कोणताही त्रास होता कामा नये.

स्वयंसेवी गट घेत असलेली समानतेची शपथ मौलवींनी बंद पाडली !

केरळमधील साम्यवादी सरकारचे खरे स्वरूप जाणा ! एरव्ही स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलणारे साम्यवादी मुसलमानांच्या लांगूलचालनापायी कसे तत्त्वांना तिलांजली देतात, याचे हे उदाहरण होय !