बारामती (पुणे) लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराला दिले ‘तुतारी’चे चिन्ह !

सुप्रिया सुळे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे ‘तुतारी फुंकणारा माणूस’ असे चिन्ह आहे, तर अपक्ष उमेदवाराला ‘तुतारी’ चिन्ह दिले आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ होऊ शकतो, असे सुळे म्हणाल्या.

माझे १६ सहस्र कोटी रुपयांचे आस्थापन कवडीमोल दराने घेतले ! – डी.एस्. कुलकर्णी यांचा आरोप

सध्या अंगावरील कपडे सोडता माझ्याकडे काही नाही. माझ्या मालमत्ता, तसेच अधिकोषातील खाती गोठवली आहेत. मी ठेवीदारांचे पैसे कसे परत करू ? असाही प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.

राज्यातील ग्रंथालये बंद पडण्याची स्थिती !

ग्रंथालये ज्ञानवृद्धीची ठिकाणे असल्याने ती बंद पडू न देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होणे आवश्यक !

राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती तातेड यांच्याकडून पोलिसांना समन्स !

न्यायमूर्ती के.के. तातेड यांनी हा विषय ‘सुओ मोटो’ विचारार्थ प्रविष्ट करून घेत राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, तसेच बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्स जारी केले आहे.

मलठण (दौंड) येथे २९ गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात गोरक्षकांना यश !

प्रत्येकवेळी गोहत्या करण्यामध्ये धर्मांधांचा हात असणे, संतापजनक आहे. धर्मांधांना कठोर शिक्षा होत नसल्याचा हा परिणाम !

छत्रपती संभाजीनगर येथे अल्पवयीन चोरटा गुन्हे शाखेच्या हातून निसटला !

अल्पवयीन गुन्हेगारांना पकडून न ठेवणारे पोलीस शस्त्रधारी सराईत गुन्हेगारांना पकडू शकतील का ? असे पोलीस खात्याला कलंक आहेत !

सामूहिक बलात्काराच्या आरोपामध्ये खटल्याच्या विलंबामुळे जामीन देता येणार नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

१५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना गंभीर असून खटल्याचा विलंब हे जामीनाचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

पुणे येथील एका शाळेत शिपायाचा १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !

पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचाराविषयी कुणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती.

छत्रपती संभाजीनगर येथे ‘खटला मागे घे’ असे म्हणत अधिवक्त्याकडून महिलेचा विनयभंग !

असे अधिवक्ते लोकांना काय न्याय मिळवून देणार ? अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे !

हिंदूंमध्ये शौर्यवृद्धी व्हावी आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे यांसाठी नंदुरबार जिल्ह्यात १२ ठिकाणी गदापूजन !

गदापूजनाच्या कार्यक्रमासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.