पुणे येथील एका शाळेत शिपायाचा १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न !

समाजाची नीतीमत्ता घसरत चालल्याचे उदाहरण !

पुणे – येथे वाघोली येथील एका नामांकित शाळेत शिकणार्‍या १० वर्षाच्या विद्यार्थ्यावर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपीवर पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या आईने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. अत्याचाराविषयी कुणाला काही न सांगण्याची धमकी आरोपीने दिली होती. त्यामुळे पीडित मुलगा घाबरला होता.

आरोपीने पीडित मुलाशी गोड बोलून त्याला ‘तुला चित्रपट आवडतात का ?’, असे विचारले. पीडित मुलाने ‘हो’ उत्तर दिल्यानंतर आरोपीने ‘टॉयलेटमध्ये चल… मी तुला एक फिल्म दाखवतो’, असे म्हटले. पीडित मुलाने नकार दिल्यावर आरोपीने त्याच्यावर बळजोरी केली. पीडित मुलगा पळून गेला. आरोपी वर्गात येऊन ‘तुला इथेच फिल्म दाखवतो’, असे बोलून त्याने भ्रमणभाषमध्ये ‘अश्लील वेबसाईट’ दाखवून ‘कुणाला काही सांगू नको’, अशी धमकी दिली.