मुंबई – सामूहिक बलात्कारासारख्या गंभीर आरोपामध्ये खटल्याला विलंब झाला म्हणून जामीन संमत करता येणार नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या खटल्याविषयी नोंदवले आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या एकलपिठाने हा निर्णय दिला.
या खटल्यामुळे ऑक्टोबर २०२० पासून आरोपी कारागृहात आहे; मात्र खटल्यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे विलंबाचे कारण देत आरोपीने जामिनासाठी अर्ज केला; मात्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवून जामिनाचा अर्ज फेटाळला. आरोपीवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे. आरोपी दोषी असल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. १५ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. ही घटना गंभीर असून खटल्याचा विलंब हे जामीनाचे कारण होऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.