छत्रपती संभाजीनगर – ‘तू माझ्या विरुद्ध न्यायालयात प्रविष्ट केलेला खटला मागे घे, नाहीतर तुला जिवे मारू’, अशी धमकी देऊन अधिवक्ता शामसुंदर वाघ यांनी एका महिलेचा विनयभंग केला. अधिवक्ता वाघ यांनी त्या महिलेचे घर आणि शेतीची मूळ कागदपत्रे परत देण्यास नकार दिला, तसेच ‘तुझे पेपर मिळणार नाहीत. तुझा खटला मीच चालवणार आहे. दुसरा अधिवक्ता उभा राहू देणार नाही’, अशी धमकी दिली. हा प्रकार जानेवारी २०२३ ते ३० मार्च २०२४ या काळात सिडको भागात घडला. आरोपी वाघ यांनी वारंवार महिलेचा पाठलाग करून तिच्या भ्रमणभाषवर अश्लील संदेश पाठवले आहेत. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अधिवक्ता वाघ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअसे अधिवक्ते लोकांना काय न्याय मिळवून देणार ? अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! |