इंदिरा गांधी यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘धाडसी’ असा उल्लेख !

  • हिंदु महासभेकडून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जुने पत्र उघड

  • इंदिरा गांधींनी ११ सहस्र रुपयांची देणगीही दिल्याचे उघड

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इंदिरा गांधी

पुणे – माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा एका पत्रात ‘धाडसी’ असा उल्लेख केला होता. यासह सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने इंदिरा गांधी यांनी स्वतःच्या खात्यातून ११ सहस्र रुपयांची देणगीही दिली होती. हे काम कुणाच्या दबावाखाली केले ?. राहुल गांधी यांनी त्यांच्या आजीचे ते पत्र वाचले नाही का ?, असे प्रश्‍न हिंदु महासभेने उपस्थित केले आहेत.

‘सावरकरांनी इंग्रजांची क्षमा मागितली’, असा आरोप राहुल गांधी यांनी नुकताच केला. त्यावर आक्षेप घेत हिंदु महासभेने वरील जुने पत्र समोर आणले. हिंदु महासभेचे नेते आनंद दवे यांनी हे पत्र उघड केले. त्यावर २० मे १९८० असा दिनांक असून इंदिरा गांधी यांची स्वाक्षरीही आहे.

संपादकीय भूमिका

  • इंदिरा गांधी यांच्या या पत्राविषयी राहुल गांधी यांना काय म्हणायचे आहे ?