‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये कोणत्याही ओळखपत्राविना पालटू शकता २ सहस्र रुपयांच्या नोटा !

१९ मे या दिवशी रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची घोषणा केल्यावर सामाजिक माध्यमांतून त्या जमा करण्यासंदर्भात अनेक उलट-सुलट गोष्टी पसरवल्या जात आहेत.

देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !

खलिस्तानी समर्थक आतंकवादी अमृतपाल सिंह याला ‘एन्.आय.ए.’ ने घेतले कह्यात !

खलिस्तान टायगर फोर्सशी संबंधित असलेल्या आतंकवादी अमृतपाल सिंह याला नुकतेच फिलिपाइन्समधून भारतात आणण्यात आले. अमृतपाल सिंह देहली विमानतळावर येताच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) त्याला अटक केली.

कुनो नॅशनल पार्कमधील चित्ते दुसरीकडे हलवावेत !  – सर्वोच्‍च न्‍यायालय

मध्‍यप्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्‍ये आफ्रिकेतून आणलेल्‍या चित्त्यांपैकी ३ चित्त्यांचा गेल्‍या २ मासांत मृत्‍यू झाला. यावरून सर्वोच्‍च न्‍यायालयाने चिंता व्‍यक्‍त करत ‘त्‍यांना दुसर्‍या उद्यानात हलवण्‍याचा विचार करावा’, असे सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी २८ मे या दिवशी करणार नव्या संसद भवनाचे उद्घाटन !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते २८ मे या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ‘सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पां’तर्गत ही इमारत बांधण्यात आली आहे.

ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण आणि शिवलिंगाची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती

अलाहाबाद उच्च न्यायालयाने यापूर्वी हे सर्वेक्षण आणि चाचणी करण्याची अनुमती दिली होती. याला ज्ञानवापी मशीद प्रबंधन समितीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अशी स्थगिती दिली.

‘द केरल स्टोरी’वरील बंगालमधील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली !

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अभिनंदनीय आहे. यासमवेतच अशा प्रकारे मुसलमानांना खुश करण्यासाठी हिंदूंवरील अत्याचार दडपणारी ही अन्यायी बंदी घातल्यावरून बंगाल सरकारला दंडही केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

अर्जुन राम मेघवाल हे नवे कायदामंत्री !

केंद्रशासनाने कायदामंत्री किरेन रिजिजू यांच्या खात्यात पालट केला असून त्यांच्याकडे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. अर्जुन राम मेघवाल हे आता नवे कायदामंत्री असतील.

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तर तमिळनाडूतील जल्लीकट्टूवरील बंदी उठली ! – सर्वोच्च न्यायलय

महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला, तसेच तामिळनाडूतील जल्लीकट्टू खेळाला अनुमती देणार्‍या कायद्यांना आव्हान देणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या खंडपिठाने हे खेळ खेळण्याची अनुमती दिली आहे.

प्रेमविवाहामुळे घटस्फोट वाढले ! – सर्वोच्च न्यायालय

देशात घटस्फोटांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे प्रेम विवाह हे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.