भारतात होणार निर्मिती

नवी देहली : भारताने फ्रान्सच्या ‘दसॉल्ट’ आस्थापनाकडून ११४ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संमती दिली. हा प्रस्ताव आता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेमध्ये मांडला जाईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक मंत्रीमंडळ समितीकडून अंतिम संमती मिळण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित बैठकीत या करारावर मोहोर उमटण्याची शक्यता आहे. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ही विमाने भारतात बनवण्यात येणार आहेत.
🇮🇳✈️ Historic Boost for Indian Air Force
India clears its largest-ever defence deal 🇮🇳
➡️ Purchase of 114 Rafale fighter jets from Dassault Aviation
💰 Estimated value: ₹3.25 lakh crore
Notably, the approval comes just ahead of the India visit of French President Emmanuel… pic.twitter.com/mQf3Z6Mi3U
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2026
भारतात १७६ राफेल विमाने होतील !
वायूदलाने यापूर्वीच ३६ राफेल विमानांचा समावेश केला असून भारतीय नौदलाने २६ राफेल मरीनची मागणी दिली आहे. ११४ राफेलचा करार पूर्ण झाल्यानंतर, भारताच्या ताफ्यात राफेल विमानांची संख्या १७६ होईल.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !