शबरीमला (केरळ) मंदिरातील सोने चोरीला गेल्याचे प्रकरण

थिरूवनंतपूरम् (केरळ) : शबरीमाला मंदिरातील सोने चोरीला गेल्याच्या प्रकरणी राज्य सरकारच्या विशेष अन्वेषण पथकाने ९ जानेवारीला मुख्य पुजारी कंडारारू राजीवारू यांना कह्यात घेतले होते. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘या प्रकरणातील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन् पोट्टी यांच्याशी राजीवारू यांचे जवळचे संबंध होते’, असे अन्वेषण अधिकार्यांनी सांगितले.
अन्वेषणात असे समोर आले की,
भगवान अयप्पा मंदिरात द्वारपालक मूर्ती आणि श्रीकोविलचे सुवर्णपात्र यांच्या संशयास्पद खरेदीच्या शिफारसीतही राजीवारू यांची भूमिका होती. या प्रकरणातील ही ११ वी अटक आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने पैशांच्या अफरातफर प्रकरणी नोंदवला गुन्हा !
या प्रकरणाचे अन्वेषण अंमलबजावणी संचालनालयाकडूनही स्वतंत्रपणे केले जात आहे. त्याने या प्रकरणी पैशांच्या अफरातफरीच्या संदर्भातील कलमे लावत गुन्हा नोंदवला आहे. केरळ उच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये विशेष अन्वेषण पथकाचा आक्षेप फेटाळत संचालनालयाला स्वतंत्र अन्वेषण करण्याची अनुमती दिली होती.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा परिणाम जाणा ! मुख्य पुजार्याला अटक होत असेल, तर मंदिर समितीतील सरकारनियुक्त लोक किती भ्रष्ट असतील, याची कल्पना करता येईल. त्यामुळे आतातरी सरकारीकरणाला प्राणपणाने विरोध करा ! |
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी