CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !

समान नागरी कायद्यावरून मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांचे विधान

इंदूर (मध्यप्रदेश) – जर प्रभु श्रीरामचंद्र एक विवाह करतात, तर रहिमकडूनही एकाच विवाहाची अपेक्षा केली जाऊ शकते. मुसलमान भगिनी देखील आपल्याच बहिणी आहेत. त्यांच्याही आयुष्यात अडचणी येतात; म्हणूनच कायदा सर्वांसाठी समान असायला हवा, असे विधान मध्यप्रदेशातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी येथे एका कार्यक्रमात समान नागरी कायद्याविषयी (सर्व धर्मियांसाठी समान कायदा) बोलतांना केले.

पावसाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचे विधेयक सादर करण्याची सिद्धता

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव पुढे म्हणाले की, राज्य सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत आहे. येत्या २० जुलैपासून चालू होणार्‍या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात महत्त्वाचे पाऊल उचलले जाऊ शकते. या संदर्भात प्रारूप सिद्ध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीने सरकारकडे अहवाल सादर केला केला आहे. हा अहवाल आता पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी विधी विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

१० लाखांपेक्षा अधिक सूचना आणि सर्व घटकांशी संवाद

मुख्यमंत्री डॉ. यादव म्हणाले की, सरकारने हा कायदा लागू करण्यापूर्वी व्यापक पातळीवर जनसंवाद साधला आहे. विशेष समितीने राज्यातील सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विविध धर्म, समुदाय, सामाजिक संस्था आणि राजकीय पक्ष यांच्याशी चर्चा करून तब्बल १० लाखांपेक्षा अधिक सूचना गोळा केल्या आहेत. सर्व घटकांच्या विचारांचा आदर करून सर्वसंमतीने हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

संपादकीय भूमिका

राम आणि रहिम यांची तुलना कधीही होऊ शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे ! भारत हा श्रीरामाचा देश आहे, तर ‘रहिम’ भारताला देश मानत नाही; म्हणून तो ‘वन्दे मारतम्’ म्हणण्यास नकार देतो, ही वस्तूस्थिती आहे !