ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांचे विधान

जयपूर (राजस्थान) : संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असायला हवा, असे विधान ब्रिटनचे खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी केले. ते येथील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
🇮🇳 J&K Is an Integral Part of India 🇮🇳
British MP Bob Blackman, speaking in Jaipur, reaffirmed that the entire Jammu & Kashmir belongs to India.
🗣️ @BobBlackman said he has held this stand since 1992, when Kashmiri Pandits were forced out, and not just after Narendra Modi… pic.twitter.com/BfuLnUaWwy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 6, 2026
वर्ष १९९२ मध्येच कलम ३७० रहित करण्याची भूमिका मांडली
ब्लॅकमॅन यांनी म्हटले, ‘वर्ष १९९२ मध्येच कलम ३७० रहित करण्याचा मी आग्रह धरला होता. तेव्हा काश्मिरी हिंदूंना त्यांचा धर्म आणि ओळख यांमुळे घरदार सोडावे लागले होते. त्या काळात ब्रिटनमध्ये या अन्यायाच्या विरोधात जनजागृती करण्याचे प्रयत्न करण्यात आला होता.’
You can read about my stance on the Indian government's decision to revoke article 370 here:https://t.co/eP9V8Y7SKt
— Bob Blackman (@BobBlackman) August 13, 2019
आतंकवाद आणि पाकिस्तान यांचा निषेध
ब्लॅकमॅन यांनी जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी कारवायांचा सातत्याने निषेध केल्याचे सांगितले. जम्मू-काश्मीरच्या काही भागांवरील पाकिस्तानच्या बेकायदा नियंत्रणावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. संपूर्ण जम्मू-काश्मीर भारताच्या प्रशासनाखाली यावे, हीच त्यांची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले.
ब्रिटनने भारताच्या पाठीशी उभे रहावे !
पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात २६ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा ब्लॅकमॅन यांनी तीव्र निषेध केला होता. निर्दोष नागरिकांच्या मृत्यूबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले आणि आतंकवादाविरुद्ध भारतासमवेत ठामपणे उभे रहाण्याचे आवाहन ब्रिटन सरकारला केले.
पाकिस्तानला ‘अपयशी राष्ट्र’ संबोधले
यापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात ब्लॅकमॅन यांनी पाकिस्तानला अपयशी राष्ट्र म्हटले होते आणि तेथील सैन्य-राजकीय समीकरणांवर प्रश्न उपस्थित केला होता. पाकिस्तानकडून भारतात आतंकवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय समुदायाने भारतासोबत एकजुटीने उभे रहाण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !