
मुझफ्फराबाद (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले २० दिवस आंदोलन करणार्या स्थानिकांवर पाकच्या सुरक्षादलांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. यात १२ जणांचा मृत्यू, तर ३८ जण घायाळ झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील १०० हून अधिक नागरिकांनी पाक सैन्याच्या दडपशाहीविरोधात व्हाईट हाऊसबाहेर आंदोलन केले. त्यांनी पाकिस्तानी सैन्य हटवण्याची आणि या गोळीबाराची आंतररष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली.
आंदोलनाचे नेतृत्व करणार्या ‘जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी’ने आरोप केला की, सुरक्षादलांनी साध्या वेशात गोळीबार केला. मोर्चा रोखण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि पोलीस यांनी रावलकोट, मुझफ्फराबाद आणि आसपासची शहरे बंद केली आहेत. महत्त्वाच्या सर्व मार्गांवर अडथळे उभारण्यात आले असून ४ सहस्र सैनिक, पोलीस आणि ‘फ्रंटियर कोर’चे सैनिक तैनात करण्यात आले आहेत. कमिटीचा दावा आहे की, दडपशाही असूनही ४० सहस्रांहून अधिक नागरिक मुझफ्फराबादकडे निघालेल्या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.
कमिटीचे आंदोलन ३८ सूत्री मागण्यांवर आधारित आहे. विधानसभेतील १२ राखीव जागा रहित करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक अधिकार देणे, वीज, पीठ आणि खत यांवर अनुदान देणे, तसेच अटकेतील नेत्यांची सुटका करणे, या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
नेपाळमधील तरुण पुन्हा रस्त्यावर : बेरोजगारीच्या विरोधात संताप !
अमेरिकेकडून इराणच्या १४० सैन्य ठिकाणांवर आक्रमणे
‘लव्ह जिहाद’ आणि हिंदु तरुणीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्याच्या प्रकरणी ग्रामस्थांचा कागल (जिल्हा कोल्हापूर) पोलीस ठाण्यावर मोर्चा !