सातारा येथे चालू असलेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या निमित्ताने…
राष्ट्रवादावाचून मराठी साहित्य संमेलन, म्हणजे अमावास्येला कोजागरी साजरी करणे !
प्रतिवर्षी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते. या मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रवादाला कुठेही स्थान नसल्याचे आढळून आले आहे. तुर्की, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, अशा परकीय आक्रमकांना नमवून पराभवाची परंपरा नष्ट करून विजयाची परंपरा निर्माण केली, ती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ! त्यासाठीच त्यांनी महादेवासमोर हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि पूर्णत्वास नेली. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणार्या साहित्य संमेलनात मात्र राष्ट्रवादाला कोणतेही स्थान नाही, हे लज्जास्पद आहे.
१ जानेवारी २०२६ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘राष्ट्रविघातक विचारांना विरोध करण्यासाठी साहित्य संमेलनात चर्चासत्र नसणे आश्चर्यजनक, समर्थ रामदासस्वामी यांनी केलेले पारतंत्र्याच्या दुःखाचे वर्णन आणि विद्रोही डॉ. आ.ह. साळुंखे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची अपकीर्ती करूनही त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी प्रयत्न करणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/992762.html
५. संवेदनाहीन साहित्यिकांच्या उद्दामपणाचे टोक !
स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, त्याचा अपवाद वगळता आजपर्यंत झालेल्या साहित्य संमेलनात राष्ट्रवाद, धर्म, संस्कृती यांविषयी चकार शब्दही उच्चारण्यात आलेला नाही. वास्तविक ‘हिंदुत्व हा आपल्या राष्ट्राचा प्राण आहे’, याचे भान आजच्या साहित्यिकांपैकी किती जणांना आहे, हा प्रश्नच आहे.
देश स्वतंत्र झाल्यापासून आणि काँग्रेसची सत्ता असेपर्यंत मुसलमान समाजाकडून हिंदूंवर अत्याचार झाले. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे, हे साहित्यिकांचे कर्तव्य आहे; पण त्याची जाणीव असणार्या साहित्यिकांची संख्या अत्यल्प आहे आणि त्यांना ‘लिब्राडू’ (उदारमतवादी) साहित्यिक साहित्य संमेलनाच्या वेळी त्या संमेलनात आसपास फिरकूसुद्धा देत नाहीत. अशा वेळी त्यांना व्यक्तीस्वातंत्र्य, मूलभूत अधिकार यांसारख्या गोष्टींचा विसर पडतो. त्यांच्याकडून आपल्याच साहित्यिक बांधवांवर अन्याय होतो आहे, याचे भानही रहात नाही. असे संवेदनाहीन साहित्यिक स्वतःला ‘विद्रोही साहित्यिक’ म्हणून समाजात ताठ मानेने वावरतात. हे उद्दामपणाचे टोक झाले, असेच म्हणावे लागेल.
भाषाप्रभु पु.भा. भावे यांनी सावरकर आणि ‘हिंदुत्व’ यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार !

सावरकर यांना गुरुस्थानी मानणार्या भाषाप्रभु पुरुषोत्तम भास्कर भावे यांनी ‘सावरकर नावाची ज्योत’ या त्यांच्या पुस्तकात ‘सनातन सत्याचे प्रेषित’ म्हणून सावरकर यांचा गौरव करतांना ते लिहितात…

‘हिंदु धर्म किंवा हिंदु राष्ट्रीयत्व यांच्या अंगाने उभे राहिलेले वीर सावरकर हे कधीही जुन्या होऊ न शकणार्या एका सनातन सत्याचे अंगानेच उभे आहेत. इथेही पुनश्च एकदा ते प्रेषित ठरले आहेत. धर्म ही नेहमीच माणसाचे उदात्तीकरण करणारी एक महान प्रेरणा होती आणि राहील. धार्मिक जागृतीने राष्ट्राचा कायापालट होऊ शकतो. जगात हिंदुत्व भारताचा कायापालट करू शकेल. ऐहिक उत्कर्षाचे शिखर गाठणार्या इंग्लंडने त्याचा धर्म कधी नाकारला नव्हता. उलट इंग्लिश राजाने ‘ख्रिस्ती धर्माचा संरक्षक’ हे बिरुद मोठ्या अभिमानाने मिरवले. ब्रह्मदेशाच्या समाजवादी राष्ट्राने बौद्ध धर्म त्यांचा राष्ट्रीय धर्म मानला. ब्रिटीश शासनात सिंहासनाला कॅथोलिकाचा स्पर्शही होऊ नये, अशी व्यवस्था ब्रिटीश निर्बंधांनी करून ठेवली आहे. तेव्हा हिंदुत्वाविषयी अभिमान बाळगला; म्हणून वीर सावरकरांना नाके मुरडण्याचे कारण नाही. ‘हिंदुत्व’ हा हिंदुस्थानचा राष्ट्रीय धर्म आहे आणि हेच या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. हिंदुत्वाचे पतन, हेच या देशाचे पतन ठरेल. हिंदुत्वाचे उत्थान, हेच या देशाचे उत्थान ठरेल.’
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
६. साम्यवादी आणि मुसलमान यांच्या विचारांच्या विरोधात लढण्यासाठी सावरकर यांचा राष्ट्रवाद उपयुक्त !
साम्यवादी आणि मुसलमान दोघेही एकच ग्रंथ अन् एकच प्रेषित यांवर विश्वास ठेवणारे असल्यामुळे त्यांच्या असहिष्णुतेला कोणत्याही प्रकारची सीमा राहिलेली नाही. त्यामुळे ते ज्या देशात रहातात, त्या देशाशी ते एकनिष्ठ रहात नाहीत. त्यांची निष्ठा ही देशाबाहेरच्या राष्ट्रांशी असते. ‘बहुसंख्य असलेल्या हिंदूंचे धर्मांतर घडवून आणायचे आणि स्वतःचे संख्याबळ वाढवायचे’, हा त्यांचा दुष्ट हेतू जगापासून लपून राहिला नाही. म्हणून आपल्या देशात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा निनादतात आणि साम्यवाद्यांना चीनचा विजय स्वतःचा विजय वाटतो.
याच्याविरुद्ध लढण्यासाठीच उपयुक्त ठरतो, तो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा राष्ट्रवाद ! म्हणूनच विद्रोही साहित्यिक आणि साम्यवादी विचारांची पिल्लावळ सावरकर यांना सातत्याने विरोध करत राहिली आहे.
७. भाषाप्रभु पु.भा. भावे यांनी सांगितलेला ‘सावरकर यांचा राष्ट्रवाद’
‘सावरकर यांचा राष्ट्रवाद’ याविषयी भाषाप्रभु पु.भा. भावे ‘सावरकर नावाची ज्योत’ या पुस्तकात लिहितात…

‘मुसलमानांची आणि कम्युनिस्टांची (साम्यवाद्यांची) वृत्ती लक्षात घेता सावरकर यांचा हिंदु राष्ट्रवाद हाच विश्वास पात्र आणि विशुद्ध राष्ट्रवाद आहे, हे ध्यानात येण्यास अडचण पडू नये. हिंदु राष्ट्रवादी संकुचित आणि प्रतिगामी कल्पना नसून उदार अन् पुरोगामी कल्पना आहे. हिंदुत्व हे स्वभावतःच सहिष्णु आणि उदार आहेत. ज्याने त्याने आपल्या धर्माप्रमाणे वागावे. देवाकडे जाण्याचे मार्ग अनेक असू शकतात. ही उदार भूमिका केवळ हिंदूंजवळच आढळून येते. अन्य धर्मियांचा अट्टहास असा की, देव केवळ आमच्याच धर्मामुळे मिळतो. अन्य काफीर नरकाचे धनी होतात. त्यांनी धर्मांतर करावे अथवा मरावे. मुसलमान, ख्रिस्ती किंवा कम्युनिस्ट या सार्यांचा हाच अट्टहास आहे. जात्यातच हे धर्म असहिष्णु आणि आक्रमक आहेत. सर्वांना आपल्यासारखे करण्यासाठी स्वैरपणे ते तलवार आणि अग्नीचा उपयोग करतात. म्हणून या पंथांचा प्रतिकार अपरिहार्य आहे. या पंथांचा प्रतिकार, म्हणजेच असहिष्णु आक्रमणाचा प्रतिकार. ‘हिंदुत्वाचे रक्षण, म्हणजेच उदार अशा सहिष्णुतेचे रक्षण !’ कारण… सहिष्णुतेचे अथवा औदार्याचे मूल्य मानणारा समाजच मेला, तर ती मूल्येसुद्धा मरून जातील. राष्ट्रीय वृत्तीचा समाज जगला, वाढला, तर राष्ट्रीयता जगेल आणि वाढेल. शुद्धी संघटनेच्या चळवळीत हेच सूत्र अंतर्भूत आहे. धर्मांतरामुळे होणार्या राष्ट्रांतराला, मूल्यांतराला पायबंद घालणारी अशी सावरकर पुरस्कृत शुद्धीची चळवळ आहे. हिंदूंचे संघटन, म्हणजे देशातील अविभाज्य निष्ठेच्या राष्ट्रकांचे संघटन, राष्ट्रीय वृत्तीचे आणि शक्तीचे संघटन ! अशा या संघटनेला प्रतिगामी म्हणता येत नाही. कुठल्याही राष्ट्रीय चळवळीसाठी सर्वस्व देणारे सामान्यतः सगळे हिंदूच आहेत. हिंदु समाज हाच या भूमीचा निष्ठावंत पुत्र समाज आहे. त्याचे बळ हेच या देशाचे विश्वास पात्र बळ आहे. म्हणूनच वीर सावरकर यांनी ‘राजकारणाचे हिंदूकरण’ आणि ‘हिंदूंचे सैनिकीकरण’ करण्याचा संदेश फार वर्षांपूर्वी दिला. त्या वेळी त्यांची ‘रिक्रूटवीर’ (भरती करणारे) म्हणून हेटाळणीही झाली. कुणी त्यांना मध्ययुगीन म्हणून वाक्ताडन केले; परंतु संघर्ष हे जीवनातील एक सनातन सत्य आहे. संघर्ष एक अटळ सत्य असेल, तर सैनिकीकरण हे अटळ सत्य आहे. हे सत्य ज्यांनी उपेक्षिले, ते राष्ट्रघाताला कारणीभूत झाले. घातपातापासून राष्ट्राचे रक्षण व्हावे; म्हणून सावरकर यांनी सैनिकीकरणाचा संदेश दिला. ‘मागासलेले’ ही पदवी मिळवली; परंतु मागासलेपणाचा लवलेशही सावरकर यांच्या ठिकाणी नाही. ते जातीभेदाचे समर्थन करत नाहीत. विटाळ (मासिक पाळी) चांडाळ (अस्पृश्य) मानत नाहीत. सरंजामी आणि सामंतवादी व्यवस्था पुनश्च प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी कधीही बाळगली नाही.’
सावरकर यांच्या या विशुद्ध विचारांना स्वीकारून हे विचार स्वतःच्या मन मस्तिष्कावर रुजवण्याचे सामर्थ्य मुसलमान, साम्यवादी आणि विद्रोही साहित्यिक यांच्यामध्ये नाही.
राष्ट्रघातक चळवळींच्या विरोधात ‘ब्र’ही न काढणारे विद्रोही साहित्यिक !

जगात हिंदुत्वाचे आणि हिंदु राष्ट्राचे पतन व्हावे, अशीच मनीषा बाळगणारे साहित्य संमेलनाचे आधारस्तंभ झाले असल्यामुळे या संमेलनात हिंदु महिलांवर होणारे बलात्कार, लव्ह जिहाद, भूमी जिहाद यांसारख्या राष्ट्रघातक चळवळींच्या विरोधात एक शब्द लिहिण्याआधीच विद्रोही साहित्यिकांची लेखणी गोठून जाते. हिंदुत्वाच्या विरोधात मात्र सभ्यता आणि संस्कार यांच्या सर्व मर्यादा उल्लंघून त्यांची लेखणी स्वैर संचार करते.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर
८. साहित्य संमेलनात असत्य, अन्याय, अत्याचार यांच्या विरोधात चर्चासत्र नसणे
मुळातच जिथे चांगले चालले आहे, ते उद्ध्वस्त करण्याची विकृत मनोवृत्ती धारण केलेल्या लोकांना हिंदु राष्ट्रवाद जो सज्जनतेची शिकवण देतो आणि सर्वांनी सज्जनतेने वागावे, असा आग्रह धरतो तो पचणार नाही, तो मानवणार नाही. असत्य, अन्याय, अत्याचार, कटकारस्थाने, रक्तपात यांची नशा चढलेल्यांना अमृतासारखे असलेले विचारही विष समान वाटतात; म्हणून ते असत्य, अन्याय, अत्याचार या विरोधात त्यांच्या साहित्य संमेलनात चर्चासत्र ठेवत नाहीत. यांचे नेमके विश्लेषण ‘सावरकर नावाची ज्योत’ या पुस्तकात भाषाप्रभु पु.भा. भावे या साहित्यिकाने केली आहे.
८ अ. पु.भा. भावे यांचे भाषण उधळून लावण्याचा प्रयत्न दुष्प्रवृत्तींनी करणे : म्हणूनच ज्या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून पुरुषोत्तम भास्कर भावे यांची निवड करण्यात आली, त्या वेळी त्यांचे साहित्य संमेलनाचे भाषण उधळून लावण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी करून त्यांना अपमानित केले होते. ही घटना हिंदु राष्ट्रवादाचा पुरस्कार करणार्या जनतेच्या विस्मरणात जाणे शक्य नाही.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२८.१२.२०२५)
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/993659.html

देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !