Randhir Jaiswal : बांगलादेशात अल्पसंख्यांकांच्या विरोधातील हिंसा चिंताजनक !

बांगलादेशात दीपू चंद्र दास याच्या हत्येनंतर भारताची मुळमुळीत प्रतिक्रिया !

रणधीर जयस्वाल

नवी देहली : बांगलादेशात अल्पसंख्याकांच्या विरोधात होत असलेली हिंसा चिंताजनक आहे. अल्पसंख्यांकांमध्ये हिंदू, ख्रिस्ती आणि बौद्ध समुदायाचे लोक आहेत अन् त्यांच्या विरोधात सातत्याने हिंसा होत आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. दीपू दास यांच्या झालेल्या हत्येचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि दोषींना कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी व्यक्त केली.

जयस्वाल पुढे म्हणाले की, बांगलादेशातील विद्यमान अंतरिम सरकारच्या कारकीर्दीत हिंदूंच्या विरोधात हत्या, जाळपोळ आणि भूमी बळकावण्याच्या जवळपास २ सहस्र ९०० घटना नोंदल्या गेल्या आहेत. अशा घटनांकडे सहजतेने पहाणे योग्य नाही. बांगलादेशातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. या घटनांना केवळ माध्यमांतून आलेल्या बातम्या किंवा राजकीय हिंसा, असे समजून नाकारता येणार नाही.

केवल ५ सेकंड दे — बांग्लादेश के हिंदुओं के लिए! 🚩

बांग्लादेशी हिन्दू आज डर और हिंसा के बीच जी रहे हैं। केवल हिंदू होने के कारण उनको निशाना बनाया जा रहा है। यह केवल किसी एक देश का मुद्दा नहीं, अपितु मानवाधिकारों पर सीधा आक्रमण है।

आपका एक हस्ताक्षर उनके लिए सुरक्षा और न्याय की आवाज बन सकता है।

👉 ‘बांग्लादेशी हिन्दू अकेले नहीं हैं,’ यह संदेश देने के लिए अभी पीटिशन साइन करें !
Sign Petition : https://www.hindujagruti.org/hindi/save-bangladeshi-hindus

हिन्दू जनजागृति समिति से जुडें : HinduJagruti.org/join

बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका व्हाव्यात ! – भारताची अपेक्षा

येत्या १२ फेब्रुवारीला बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यावर जायसवाल म्हणाले की, भारताला बांगलादेशात स्वतंत्र, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक निवडणुका व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. भारत बांगलादेशाच्या जनतेशी सुदृढ संबंध राखण्यास कटीबद्ध आहे. तेथे शांतता आणि स्थैर्य कायम रहावे आणि सर्व पक्षांचा व्यापक सहभाग असावा, जेणेकरून लोक त्यांची मते स्पष्टपणे व्यक्त करू शकतील, अशी भारताची अपेक्षा आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रतिक्रियेचा बांगलादेशातील धर्मांध मुसलमानांवर काहीही परिणाम होणार नाही; कारण गेल्या वर्षीही तेथील हिंसाचाराच्या वेळी भारताने अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली होती !
  • ‘जर हिंदूंवर आक्रमणे झाली, तर भारताकडून पुरवण्यात येणारी वीज आणि अन्य जीवनावश्यक वस्तू यांचा पुरवठा बंद करू’ किंवा ‘बांगलादेशावर सैनिकी कारवाई करू’, अशी धमकी भारताने देणे आवश्यक आहे ! यासाठी भारताने अमेरिका आणि इस्रायल यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे !