-
‘कोल्हापूर संस्थान शाहूनगरी’ फेसबुक पृष्ठावरून गरळओक
-
फेसबुक पृष्ठावरून हिंदु देवता, संत यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका !

कोल्हापूर : हिंदु राष्ट्र समन्वय समितीने २३ डिसेंबरला पत्रकार परिषद देऊन ‘सांताक्लॉज दाखवा आणि १ लाख रुपये मिळवा’, असे जाहीर आव्हान दिले होते. यावर ‘कोल्हापूर संस्थान शाहूनगरी’ या फेसबुक पृष्ठावरून हिंदु देवता, संत यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. यात ‘सांताक्लॉज येत नाही’, हे मान्यच; पण मग मंदिरात भट बलात्कार करतात, सोने-घंट्या चोरून विकून खातात, त्या वेळी कोणतीही देवी-देवता येत नाही. हे कसे पचनी पडत नाही. म्हणजे स्वतःच ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे बघायचे वाकून हा प्रकार सर्वच धर्मांत चालू आहे. त्यातूनच हा प्रकार चालू झाला.’ असे नमूद करण्यात आले आहे. (आजपर्यंत कोणत्याही मंदिरात ब्राह्मणांनी बलात्कार केलेला नाही; मात्र केवळ हिंदू-ब्राह्मण द्वेषातून फेसबूक पृष्ठावरून टीका करण्यात येत आहे ! याच फेसबूक पोस्टमध्ये ते ‘सांताक्लॉज’ येत नाहीत, हे मान्य करतात, याचाच अर्थ जी प्रथा चुकीची असल्याचे ते मान्य करतात आणि ते करतांना हिंदु धर्मातील चुकीचे संदर्भ देऊन हिंदूंना चुकीचे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो ! वैचारिक प्रतिवाद करता येत नसल्याने हिंदु देवता-संत यांच्यावर टीका केल्याचा हा प्रकार आहे ! – संपादक)
‘कोल्हापूर संस्थान शाहूनगरी’ची हिंदु धर्मातील चुकीचे संदर्भ देऊन हिंदूंना चुकीचे ठरवणारी फेसबुक पोस्ट –
संपादकीय भूमिकासहिष्णु हिंदूंच्या देवी-देवतांवर टीका करणार्या पुरो(अधो)गाम्यांना पोलीस कारागृहात कधी टाकणार ? |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !