‘हिंदु आणि राष्ट्र हितैषी’ सदर !
![]()
१. पर्यावरणपूरक सनातन संस्कृती
‘ऋषिमुनींनी सृष्टीचा खोलवर अभ्यास करून सनातन धर्माच्या परंपरा आपल्याला दिल्या आहेत. ‘प्रत्येक तत्त्वात ब्रह्म व्यापलेले आहे’, हे आपल्याला आदि काळापासून शिकवले आहे. हिंदु संस्कृतीत मंदिरांमध्ये आणि घरोघरी प्रतिदिन ‘सर्वेऽत्र सुखिनः ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत), अशा प्रकारचे श्लोक म्हटले जातात. शास्त्र हे शब्दप्रमाण असते. आपल्याला त्याचे पालन करायचे असते. आपल्याला प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले आहे. पूर्वीचे लोक गायी, चिमण्या, मुंग्या यांच्यासाठी अन्नपदार्थ काढून ठेवत होते. आज आता ‘कावळ्याला खाऊ घातले, तर तुमच्या पितरांना मिळणार का ?’, ‘मुंग्यांना खाऊ घातल्यामुळे काय होते ?’, असे प्रश्न विचारले जातात. वटवृक्षांचे बीज कावळ्याच्या विष्ठेतून दुसरीकडे पडल्यावरच अंकुरित होते. त्यामुळे जेव्हा प्रत्येक घरात कावळ्याला खाऊ घातले जाते, तेव्हा संपूर्ण भारतात ठिकठिकाणी वटवृक्षाचे बीज पडून ते अंकुरते. त्यामुळे आधुनिक आणि बुरसटलेले नक्की कोण आहेत, हे समजते.
२. विविध पशू-पक्षी आणि कीटक यांच्यामुळे पर्यावरणाचे संतुलन

वर्ष १९५८-५९ नंतर चीनचा प्रमुख माओ झेदाँग याच्या तत्त्वानुसार एक चिमणी एका दिवसात किमान साडेचार किलो अन्न खाते. त्यामुळे त्याने मोठ्या संख्येत चिमण्यांना ठार मारले. चिमणी ही पुष्कळ किडे आणि अळ्या खाते. ती अगणित वाढणार्या कीड्यांची संख्या न्यून करते. चिमण्या संपल्याने किड्यांची टोळधाड आली आणि त्याने संपूर्ण शेतातील पीक नष्ट केले.
वर्ष १९५९-१९६१ पूर्वी चीनमधील लोक भारतियांसारखेच सात्त्विक भोजन करत होते. एकदा तेथे मोठा दुष्काळ पडला आणि लोक भुकेने मरू लागले. भुकेने तळमळणार्या लोकांनी झाडांची पाने आणि झाडांवरील कीडे खाणे चालू केले. तेव्हापासून तेथे सर्वकाही खाण्याची प्रथा पडली. त्यामागे चिमण्यांना नष्ट करण्याचे धोरण असल्याचे म्हटले जाते. चिमण्या संपूर्ण जगात किमान ५०० प्रकारचे किडे प्रतिवर्षी खातात. यावरून पर्यावरण व्यवस्था स्वतःच पर्यावरणाचे संतुलन राखत असते. ‘चिमण्या असल्या तर पर्यावरण ठीक आणि त्या नसतील, तर पर्यावरण चांगले नाही’, असे समजावे. जगातील ७२ टक्के पीक परागीभवनावर अवलंबून आहे. त्यामुळे चिमण्या, फुलपाखरे, भोवरे, कण, कीटक असे सर्वच पशू-पक्षी जिवंत रहाणे, हे आपल्यासाठी आवश्यक आहे. किटक एकमेकांना खातात. त्यामुळे पर्यावरण व्यवस्था टिकून रहाते. मानव कधीच निसर्गाशी लढू शकत नाही आणि निसर्गावर कधी विजय मिळवू शकत नाही; कारण निसर्ग हा त्याच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.
३. खर्या हरित क्रांतीसाठी वैदिक शेतीची आवश्यकता !
पूर्वी वैदिक शेती केली जात होती. शेतकरी पीक क्रमवार घेण्याचे जाणत होते. शेतभूमीतील नायट्रोजन न्यून झाले, तर त्याला वाढवण्यासाठी कोणते पीक घेतले पाहिजे ?, पाऊस केव्हा येणार ?, कशा प्रकारचे पीक कोणत्या वेळी लावायचे ? या गोष्टी ते जाणत होते. आज गांडुळापासून जैविक खत बनवले जाते. त्यामुळे भूमी सुपीक होते. पूर्वी लोक मुंग्यांना खाऊ घालायचे. त्यामुळे भूमी भुसभूशीत होऊन तिच्यात पाणी शोषून घेण्याची क्षमता निर्माण होत होती. ‘जंबू फळाला ‘रोज ॲपल’ म्हणतात. जंबू वृक्षाच्या पूर्व दिशेला ३ हाताच्या अंतरावर (१८ इंच X ३ इंच) आपल्याला वाळवीचा ढिग दिसत असेल, तर त्याच्या दक्षिण बाजूला दोन पुरुष (अनुमाने १३ फूट) खाली खोदावे. तेथे अनुमाने १५ फूट खाली आपल्याला गोड पाणी लागेल’, असे प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिले आहे.
भारतात हरित क्रांती आली. त्या वेळी अमेरिकेच्या स्वयंसेवी संस्थांच्या मागे लागून भारताने पारंपरिक शेती व्यवस्था नष्ट केली. हेच हरित क्रांतीचे लोक सुधारित बीज आपल्याला विकत आहेत. एकेकाळी भारतियांकडे १ लाख १० सहस्रांहून अधिक तांदुळाच्या जाती होत्या. त्यांपैकी आज केवळ ८ ते १० प्रकार शिल्लक राहिल्या आहेत. त्यांनी किमान ७० टक्के प्रजातीचे बीज या जगातून नष्ट केले. आस्थापने केवळ ४-५ बिजांचे ते सुधारित बिजाचे उत्पादन करतात. तेच खत आणि किटकनाशके यांचा पुरवठा करतात. त्यातून कर्करोगाला चालना मिळते. या आजारावरील औषधेही तेच निर्माण करतात. भारतात २० टक्के कीटकनाशके पंजाबमध्ये वापरली जातात. त्यामुळे तेथे कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. वेदना तेच देणार आणि औषधांचा पुरवठाही तेच करणार, अशी परिस्थिती झाली आहे.
४. गोहत्येच्या पापात अप्रत्यक्ष हिंदूही भागीदार ?
गायीला प्रतिदिन चारा खाऊ घातल्याने आणि तिच्या मस्तकावून हात फिरवल्याने मुलांमध्ये प्रेमभाव निर्माण होतो. आज ‘गाय ही दूध, मांस आणि तिचे कातडे यांसाठी पाळली जाते’, असे शाळेत शिकवले जाते. त्यामुळे मुलांमध्ये करुणा लोप पावत चालली आहे. हीच मुले शिकून पुढे नोकरशहा आणि राजकारणी होतात. आज भारत जगातील सर्वांत मोठा गोमांस निर्यातदार झालेला आहे. त्यामागे हेच कारण आहे. भारतात प्रतिवर्षी लाखो गोवंशाची पशूवधगृहात हत्या होते. हे सर्व सनातन धर्माच्या विचारसरणीच्या विरुद्ध घडत आहे. आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या पापाशी जोडले जात आहोत.
५. पृथ्वीवरील जीवन टिकवण्यासाठी सनातन परंपरांचे पालन अपरिहार्य !
सध्या मोठ्या प्रमाणात रस्ते आणि उड्डाण पूल यांची बांधकामे चालू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. त्या वेळी ‘मोठ्या झाडांचे स्थलांतर करू किंवा नवीन झाडे लावू’, असे आश्वासन दिले जाते. वास्तविक काही मोजक्याच झाडांचे स्थलांतर होऊ शकते. यासह जेवढ्या प्रमाणात जुनी झाडे तोडली जातात, त्याच्या फारच न्यून प्रमाणात झाडे लावली जातात. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पूर्वी लोक पेहरावासाठी खादीचे कापड वापरायचे. धोतर, फेटा किंवा अंगरखा खादीचेच असायचे. आता आधुनिक वस्त्रांमध्ये प्लास्टिकपासून बनलेल्या तंतूंचा वापर होत आहे. त्याचे संपूर्ण विघटन न झाल्याने पर्यावरणाची हानी होते. संपूर्ण जगाचे भविष्य केवळ सनातन धर्माच्या हातातच सुरक्षित राहू शकते. त्यामुळे पृथ्वीचे पर्यावरण राखायचे असेल, तर सनातन प्रथा आणि परंपरा यांना पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे. आपल्यासाठी पर्यावरणाचे रक्षण हाच धर्म आहे.’
– मीनाक्षी शरण, लेखिका तथा संस्थापक, अयोध्या फाऊंडेशन.
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
धर्म काटेकोर आचरण्याचे महत्त्व !
‘सनबर्न’च्या आयोजकांना दणका : सुरक्षा ठेव रक्कम जप्त करण्यास राष्ट्रीय हरित लवादाची मान्यता
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?