|

ढाका (बांगलादेश)- बांगलादेशात पुन्हा प्रचंड हिंसाचार चालू झाला आहे. ‘इन्कलाब मंच’चा युवा नेता, तसेच कट्टर भारतविरोधी शरीफ उस्मान हादी हा १२ डिसेंबर या दिवशी झालेल्या गोळीबारात घायाळ झाला होता. त्याच्यावर सिंगापूर येथे उपचार चालू असतांना १८ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाल्यानंतर रात्रीपासूनच बांगलादेशाची राजधानी येथे हिंसाचार चालू झाला. हादी याचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले. येथे अनेक कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली. तसेच २ दैनिकांच्या कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली. येथे २८ पत्रकारांना ठार मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. त्याच वेळी हिंदूंवरही आक्रमणे करण्यात आली. एका हिंदु तरुणाला जिवंत जाळण्यात आले. हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात १९ डिसेंबरला एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात आला. बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात हादी सहभागी होता. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशाचे सैन्य, तसेच अर्धसैनिकदलाच्या सैनिकांना तणावग्रस्त भागांत तैनात करण्यात आले आहे.
🚨 Bangladesh on the Brink 🚨
After the death of Inquilab Manch youth leader Usman Hadi, Bangladesh is burning 🔥
📰 Offices of @ProthomAlo & @dailystarnews torched with staff locked inside
🎙️ A journalist killed
A Hindu youth burnt aliveAs Bangladesh turns into a second… pic.twitter.com/IazTzxBXS6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
१८ डिसेंबरला रात्री ‘इन्कलाब मंच’ने ढाकामधील शाहाबाग परिसरात एकत्र येण्याचे आवाहन हादी याच्या समर्थकांना केले होते. हादी हा बांगलादेशातील विद्यार्थी नेता म्हणून उदयास आला होता. ढाका विद्यापिठातील ‘जातीया छात्र शक्ती’ या विद्यार्थी संघटनेने शोकयात्रा काढून हादी याच्या हत्येचा निषेध केला आहे. हादी याच्या मारेकर्यांना शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनाच्या वेळी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशाच्या गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घराला आग लावली.
युनूस यांच्याकडून कायदा हातात न घेण्याचे आंदोलकांना आवाहन
उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेश अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच ‘आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, हादी यांच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा केली जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
‘प्रोथोम अलो’ आणि ‘डेली स्टार’ दैनिकांच्या कार्यालयांना लावली आग !

बांगलादेशातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांपैकी एक ‘प्रोथोम अलो’ आणि ‘डेली स्टार’ या वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावण्यात आली. त्या वेळी अनेक पत्रकार आणि नागरिक इमारतीत अडकले होते. आंदोलकांनी आधी इमारतीला घेराव घातला आणि नंतर आग लावली. पोलिसांनी इमारतीत अडकलेल्या पत्रकारांना अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. या कार्यालयाची जाळपोळ करण्यापूर्वी लूटमारही करण्यात आली. तसेच अन्य प्रमुख इमारतींनाही आग लावण्यात आली.
आगीत अडकलेल्या ‘डेली स्टार’च्या पत्रकार जैमा इस्लाम यांनी ‘फेसबुक’वर याचा अनुभव सांगतांना म्हटले होते की, मला आता श्वास घेता येत नाही. येथे पुष्कळ धूर आहे. मी आत आहे.’
या आक्रमणामुळे १९ डिसेंबरला दोन्ही वृत्तपत्रे प्रकाशित होऊ शकली नाहीत. तसेच त्यांची ऑनलाईन सेवाही जवळजवळ विस्कळीत झाली होती.
‘न्यू एज’च्या संपादकांवर आक्रमण
ढाका येथील ‘न्यू एज’चे संपादक नुरुल कबीर यांच्यावर काही लोकांनी आक्रमण केले. रात्री तोडफोड आणि जाळपोळ करत आंदोलक कबीर यांच्या कार्यालयात पोचले आणि त्यांच्यावर आक्रमण केले.
मुजीबूर रहमान यांच्या निवासस्थानाची तोडफोड
हिंसक आंदोलकांनी माजी राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड केली. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या कार्यालयांनाही आग लावण्यात आली. हादी याच्या मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांनी ढाका विद्यापिठातील शेख मुजीबुर रहमान सभागृहाचे नाव ‘शहीद उस्मान हादी हॉल’ असे ठेवले आहे आणि या नावाचे फलक लावले आहेत.
पत्रकाराची गोळीबारात हत्या
बांगलादेशातील खुलना येथे पत्रकार इम्दादुल हक मिलन यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक जण घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. मिलन हे शालुआ प्रेस क्लबचे अध्यक्ष होते. गोळीबाराच्या वेळी मिलन शालुआ बाजारातील एका चहाच्या टपरीवर बसून चहा पीत होते. त्याच क्षणी २ मोटारसायकलवरून ४ जण अचानक आले, त्यांनी गोळीबार केला आणि तेथून पळून गेले.
चितगाव येथे भारतीय उच्चायुक्तालयावर आक्रमणढाक्याप्रमाणेच चितगावमध्येही अनेक ठिकाणी निदर्शने झाली. भारतीय सहाय्यक उच्चायुक्तांच्या निवासस्थानासमोर मोठा जमाव जमला. त्यांनी उच्चायुक्तालयावर विटा फेकल्या. निदर्शकांच्या एका गटाने या कार्यालयाबाहेर धरणे धरले आणि हादीच्या हत्येच्या विरोधात घोषणा दिल्या. त्यांनी अवामी लीग आणि भारतविरोधी घोषणाही दिल्या. पोलिसांनी सांगितले की, आंदोलकांचा एक गट त्याच वेळी संकुलाच्या प्रवेशद्वार क्रमांक २ वर जमला होता. पोलिसांनी कारवाई करत जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला आणि लाठीमार केला. त्यानंतर निदर्शकांनी दगडफेक केली आणि पळून गेले. याव्यतिरिक्त शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमधील माजी शिक्षणमंत्री मोहिबुल हसन चौधरी यांच्या घराची तोडफोड करण्यात आली आणि आग लावण्यात आली. |
भारताकडून बांगलादेशातील भारतियांना सूचना प्रसारित
बांगलादेशातील भारतीय उच्चायुक्तालयाने १९ डिसेंबरला सकाळी एक सूचना प्रसारित करून बांगलादेशात रहाणार्या भारतीय समुदायाच्या सदस्यांना आणि भारतीय विद्यार्थ्यांना प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेश म्हणजे दुसरे पाकिस्तान होत असल्याने भारताला आता पाक, चीन आणि बांगलादेश अशा ३ आघाड्यांवर लढावे लागणार आहे ! यासाठी भारतीय जनता सिद्ध आहे का ? |

तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
Abu Azmi : (म्हणे) ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ या सर्व मूर्खपणाच्या गोष्टी !
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !