भुसावळ (जिल्हा जळगाव) येथील कथित सर्वधर्मसमभाव सहलीचे प्रकरण

भुसावळ – येथील ख्रिस्ती अल्पसंख्यांक संस्थेच्या ‘सेंट अलॉयसियस हायस्कूल’ने ११ सप्टेंबर या दिवशी ९ वीच्या ‘स्काऊट्स अँड गाईड्स’च्या विद्यार्थ्यांची ‘सद्भावनादिना’च्या निमित्ताने कथित ‘सर्वधर्मसमभाव सहल’ काढली होती. या प्रकरणी मुख्याध्यापिका सौ. शिला, उपशिक्षक श्री. अमोल वांदळे, उपशिक्षक श्री. शेख इरफान, बर्नार्ड मॉरिस, सौ. मिशेल शे फर्नांडिस, अनधिकृत शिक्षणसेविका सौ. आफरीन खान आणि सौ. कौलीन कौर, खासगी संगणक शिक्षक गुरजितसिंह पदम यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या सहलीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मशीद आणि चर्च येथे अधिक वेळ नेले, तसेच मशिदीत खाऊही दिला आणि मंदिरात काही मिनिटांसाठी नेले. मशिदीत विद्यार्थ्यांना उपदेशही केला. मशिदीत मुलींना मोठ्या रूमालाने हिजाब घातल्याप्रमाणे डोके झाकायला लावले आणि ‘इस्लाम आतंक नव्हे आदर्श’ हे पुस्तकही वाटले.
या घटनेनंतर पालकांना कुठलीही कल्पना न देता अशा प्रकारे सहल काढल्याविषयी तक्रार संतापलेले पालक आणि हिंदु संघटना यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात प्रविष्ट (दाखल) केली आणि हिंदूंच्या भावना दुखावल्याचा गुन्हाही नोंदवण्याची मागणी केली.
पंचायत समिती भुसावळचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी किशोर नामदेव वायकोळे यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून तक्रार दिली होती. भाजपचे राज्य परिषद सदस्य प्रमोद वामन सावकारे यांच्यासह हिंदु संघटनांनी शिक्षण विभागाच्या उपविभागीय अधिकार्यांकडे लेखी तक्रार प्रविष्ट केली होती.
या संदर्भात त्रिस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने सप्टेंबरमध्ये १६ पानी अहवाल दिला. त्या अहवालात पुढील सूत्रे आहेत. पालकांची संमती केवळ सहलीसाठी होती. धार्मिक स्थळी प्रार्थना, उपदेश, रूमाल बांधणे, पुस्तकवाटप यांविषयी कोणतीही संमती नव्हती. विद्यार्थ्यांकडून १०० रुपये रिक्शा भाडे घेतले; परंतु त्याचा हिशोब दिला नाही. ऐतिहासिक आणि शैक्षणिक स्थळाऐवजी धार्मिक स्थळांना भेट दिल्याने ‘भारत स्काऊट्स अँड गाईड्स’च्या नियमांचा भंग झाला आहे. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारी कृत्ये मशिदीत झाली. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या जबाबात विरोधाभास होता. ‘शिक्षण हक्क कायदा’ आणि ‘महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी नियम’ या कायद्यांचे उल्लंघन झाले आहे.
संपादकीय भूमिकासहलीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मशीद आणि चर्च येथे नेऊन बुद्धीभेद करणार्या शिक्षकांवर लवकर कारवाई हवी ! |
भावना बोथट झाल्या ?
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !