कलांच्या आध्यात्मिक इतिहासाचे प्रास्ताविक !
४ सप्टेंबर २०२५ या दिवसापासून प्रत्येक गुरुवारी चालू झालेल्या लेखमालेत पुढील काही भागांत आपण ‘गायन, वादन, नृत्य आणि नाट्य’, या कलांचा आध्यात्मिक इतिहास पहाणार आहोत. या लेखात आपण भारतीय कलांच्या निर्मितीविषयी समजून घेऊ.
(लेखांक ७)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/967396.html
गायनकलेचा आध्यात्मिक इतिहास !
‘गायन म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर साधारणपणे ‘शास्त्रीय गायन, भजने किंवा विविध प्रकारची गीते’, हेच येते; परंतु भारतीय संगीतशास्त्रामध्ये संगीताला पुष्कळ व्यापक स्तरावर पाहिले जाते. ‘नाद’ हा संगीताचा पाया आहे. त्यामुळे संगीताच्या माध्यमातून करत असलेल्या उपासनेला ‘नादोपासना’, असेही म्हणतात.

१. संगीत आणि सामवेद
अ. सामवेदाचा गौरव करतांना भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘वेदानां सामवेदोऽस्मि ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक २२) , म्हणजे ‘सर्व वेदांमध्ये सामवेद मी (श्रीकृष्ण) आहे.’
आ. ‘सामवेद’ हा भारतीय संगीताचा पाया आहे. सामवेद हा मुख्यतः ‘ऋग्वेदातील ऋचांचे गायन कसे करावे ?’, याचे विवेचन करणारा वेद आहे. ऋग्वेदातील ऋचा गायनस्वरूपात म्हणण्याला ‘सामगान’, असे म्हणतात. सामवेदात स्वर, ताल आणि लय यांची बिजे सापडतात. त्यामुळेच सामवेदाला ‘संगीताचा जनक’, असेही म्हणतात. सामवेदातील गेय (गाता येण्यासारखी) पदे ही ३ स्वरांत गायली जात होती.
इ. प्राचीनकाळापासून यज्ञाच्या वेळी सामवेदातील सूक्ते मधुर स्वरात तल्लीन होऊन गायली जात असत. यज्ञांमध्ये पुरोहितांकरवी सामवेद मंत्रगायनाद्वारे देवतांचे आवाहन करून त्यांना हविर्भाग अर्पण केला जात असे. देवता गायनप्रिय असतात. त्यामुळे सामवेदांचे गायन ऐकायला प्रत्यक्ष देवता येतात. सामवेदाच्या गायनामुळे देवता योगनिद्रेतून लवकर बाहेर येऊन भक्ताची प्रार्थना ऐकतात. ‘गांधर्ववेद’ हा सामवेदाचा एक उपवेद आहे. तो पूर्णतः संगीताशी संबंधित आहे.
लेखातील काही संज्ञांचे अर्थ
१. मात्रा : तालाच्या प्रत्येक भागास ‘मात्रा’, असे म्हणतात.
२. ताल : नियमबद्ध मात्रांचा समूह.
३. लय : लय म्हणजे गती. दोन मात्रांमधील सारखे धावते अंतर म्हणजे लय.
४. हविर्भाग : यज्ञ करतांना देवतांना अर्पण करायचे द्रव्य.
२. भारतीय संगीताचे मूळ विभाजित प्रकार

२ अ. मार्गी संगीत (गायन) : मार्गी म्हणजेच मोक्षमार्ग दर्शवणारे ! ‘मोक्षमार्गाकडे नेणे’, हा मार्गी संगीताचा उद्देश होता. मार्गी संगीताचा उगम सामवेदातून झाला. त्या वेळी हे संगीत पूजाविधी आणि वेदपठण यांवेळी गायले जायचे. ‘हे संगीत ब्रह्मदेवाने निर्माण केले असून गंधर्वांनी ते पुढे चालवले’, असे सांगितले जाते. सध्या मार्गी किंवा गांधर्व संगीत अस्तित्वात नाही. ते संगीत लुप्त झाले आहे.
२ आ. देशी संगीत (गायन) : देशी संगीत, म्हणजे लोकांनी लोकांच्या रंजनासाठी निर्मिलेले संगीत. हे संगीत ‘लोकजीवन, लोकांच्या भावना आणि रंजन’, यांवर आधारित असते. प्रारंभी संगीत हे मार्गी, म्हणजे वेदांवर आधारित होते; परंतु काळ जसा पुढे गेला, तसे संगीत हे लोकांच्या जीवनाचा भाग बनत गेले. संगीत लोकाधारित असल्याने ते ‘लोकभावना, प्रांतीय भाषा आणि लोककथा’ यांच्याशी जोडलेले असे, उदा. अभंग, कीर्तन, भारुड, लोकगीत इत्यादी. सध्याच्या काळातही गायनाचे जे विविध प्रकार गायले जातात, उदा. शास्त्रीय रागगायन (हिंदुस्थानी आणि कर्नाटकी), उपशास्त्रीय गायन, सुगम गायन इत्यादी सर्व देशी संगीताचेच प्रकार आहेत.
३. चार युगांमधील गायनकला आणि युगांनुसार गायनाचे पालटत गेलेले स्वरूप !

४. पुराणांतील गायनकलेचे दाखले
अ. त्रेतायुगात लंकापती रावण संगीतशास्त्राचा प्रकांड पंडित होता. रावणाने स्तुतीगायन आणि वादन यांद्वारे भगवान शंकराला प्रसन्न करून त्याच्या प्राणलिंगाची प्राप्ती करून घेतली.
आ. रामायणकाळात वाल्मीकिऋषींच्या मार्गदर्शनाखाली लव आणि कुश यांनी अयोध्येतील राजसभेत श्रीराम अन् दरबारातील उपस्थित लोक यांच्यासमोर गायनाच्या माध्यमातून संपूर्ण रामायण सादर केले.
इ. महाभारतकाळात पांडव अज्ञातवासात असतांना विराट राजाच्या कन्येला (उत्तरेला) संगीत आणि नृत्य शिकवणार्या बृहन्नडेला (अर्जुनाला) इंद्राच्या आदेशानुसार गंधर्व चित्रसेन याने गायनाचे शिक्षण दिले.
५. कलियुगात संतांनी गायनाला साधनेचे माध्यम बनवणे
कलियुगामध्येही काही शतकांपूर्वी अनेक संतांनी ईश्वराच्या उपासनेसाठी गायनाचा उपयोग केला आहे, उदा. श्रीकृष्णभक्त स्वामी हरिदास, संत सूरदास, संत तुकाराम महाराज, संत पुरंदरदास. या संतांनी ईश्वराला आर्त स्वरांनी आळवले. त्यामुळेच या संतांचे गायन ऐकण्यासाठी साक्षात् भगवंत प्रकट होत असे. अशा प्रकारे या संतांनी गायनाला साधनेचे माध्यम बनवले होते.
६. सारांश
शास्त्रीय गायनाचा इतिहास पहाता आपल्या लक्षात येते, ‘आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेली आणि दैवी परंपरा लाभलेली ही गायनकला साक्षात् नादब्रह्माची, म्हणजेच सत्-चित्-आनंदाची अनुभूती घेण्यासाठीच निर्माण झाली आहे’; परंतु कालपरत्वे समाजाला याचे विस्मरण झाले आहे.
त्यामुळेच सध्या संगीताच्या मूळ उद्देशाकडे, म्हणजेच ‘संगीतातून ईश्वरप्राप्ती’कडे नेण्याची दिशा समाजाला देणे आवश्यक आहे. हे महान कार्य सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून करत आहेत.’
(क्रमशः)
– कु. तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.१०.२०२५)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/976325.html
साधकांना सूचना आणि हितचिंतकांना विनंती
या लेखमालिकेविषयी कुणाला शंका किंवा प्रश्न असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
संपर्कासाठी पत्ता –
श्री. अभिजीत सावंत संपर्क क्रमांक : ८७९३६७८१७८
ईमेल : [email protected]
| • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!
११०० व्होल्ट वीजप्रवाहाचा झटका बसून बेशुद्ध झालेल्या भक्तांना वाचवणारे ईश्वरस्वरूप योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !