|

पाटलीपुत्र (बिहार) : ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केली आहे. या अनुषंगाने ते लवकरच बिहारमध्ये ‘गोरक्षा संकल्प यात्रा’ चालू करणार आहेत. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले की, ते बिहार विधानसभा निवडणुकीत गोहत्येविरुद्ध काम करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या अपक्ष उमेदवारांनाही पाठिंबा देतील.
🚨 Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati’s big announcement:
Will field candidates in all 243 Bihar Assembly seats
Launching a Goraksha Sankalp Yatra soon
Support for independents opposing cow slaughter
🗣️ “For 7 decades no party acted on cow slaughter. We’ll vote only… pic.twitter.com/9uedZfBPcm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती पुढे म्हणाले की,
१. ७ दशके आणि अनेक आश्वासनांनंतरही कोणताही पक्ष गोहत्येविरुद्ध कारवाई करण्याचे वचन देत नाही. बिहार निवडणुकीत आम्ही गोरक्षण आणि सनातन धर्म यांसाठी मतदान करणार आहोत.
२. बिहार विधानसभा निवडणुकीत आम्ही अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देऊ, तसेच निवडणुकीत २४३ जागांवर उमेदवार उभे करू; पण त्यांची नावे आम्ही आताच उघड करणार नाही. आम्ही प्रत्येक मतदारसंघात किमान एक उमेदवार उभा करू, जो गोरक्षणासाठी समर्पित असेल.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की,त्यांचा पक्ष गोरक्षणासाठी काम करतो आणि दुसरीकडे देशात गोमांसाची निर्यात वाढत आहे. हे अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारे आहे. – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद |
३. आम्ही मतदारांना आता अशा उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करू, जे गोहत्या पाप मानतात आणि या देशातील हिंदूंच्या व्यापक भावनांशी सुसंगत राहून त्यांच्या संरक्षणासाठी काम करतात.
शिर्डी येथे ७०० किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आपत्ती निवारणासाठी संबंधित विभागांनी सतर्क रहावे ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
‘राजापूर रोड’ रेल्वेस्थानकात उद्वाहनाचे (लिफ्टचे) काम चालू
भरारी पथक निर्माण करून गोहत्या आणि गोतस्करी नियंत्रणात आणणार ! – जिल्हा पोलीस अधीक्षकांची ग्वाही