(‘कलमा’ म्हणजे अल्लाचा गौरव करणारी वाक्ये)

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील सैदाबादमधील ‘सक्सेस, द स्कूल’ने शिक्षिका शेख आयशा परवीन हिच्यावर कडक कारवाई करत तिला तत्काळ नोकरीवरून काढून टाकले आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला या शिक्षिकेने ‘कलमा’ पाठ करण्याचा गृहपाठ दिल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर शाळा प्रशासनाने अंतर्गत चौकशी करून ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. शाळेने प्रसारित केलेल्या सेवा समाप्ती पत्रात केवळ नोकरीवरून काढल्याचा उल्लेख नसून भविष्यातही त्या शिक्षिकेला संस्थेच्या कोणत्याही शाळेत नोकरी न देण्याविषयी स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रकरणावर भाजपने उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. या घटनेमागे ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन – अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) पक्षाचा हात आहे, त्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि या शाळेची मान्यता रहित करण्यात आली पाहिजे, अशी मागणी केली.
या कारवाईच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापनाने स्पष्ट संदेश दिला आहे की, शैक्षणिक परिसरात त्याच्या धोरणांच्या विरोधात जाणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही. शाळेने अजूनही हे अधिकृतपणे घोषित केलेले नाही की, नक्की कोणता गृहपाठ दिला गेला होता आणि त्याला धार्मिक का मानले गेले ?
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court
राजस्थान : ३८ गोशाळांनी अधिक गोवंश दाखवून कोट्यवधी रुपयांचे सरकारी अनुदान लाटले !