
लातूर – शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या लातूर विभागाच्या उपसंचालक (माहिती) पदाचा पदभार विभागीय माहिती कार्यालय येथे सुनील कच्छवे यांनी स्वीकारला. पदभार स्वीकारून त्यांनी विभागीय माहिती कार्यालय आणि लातूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. विभागाच्या वतीने साहायक संचालक (माहिती) डॉ. श्याम टरके यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी लातूरचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप, साहायक अधीक्षक अशोक माळगे यांसह अन्य उपस्थित होते.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा