कॅनिसोंकडून थकबाकीच्या रकमेवर वार्षिक १८ टक्के दंडवसुली करणार

पणजी, १६ जुलै (वार्ता.) – गोवा सरकारने कॅसिनोसंबंधीच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण पालट केले आहेत. राज्यात २१ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीस ‘इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशिन्स’, ‘स्लॉट मशिन्स’ किंवा ‘टेबल गेम्स’ (कॅसिनोमधील जुगार खेळांचे विविध प्रकार) या गेमिंग क्षेत्रात प्रवेश दिला जाणार नाही. राज्यातील गृह विभागाने याविषयी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
अधिसूचनेनुसार वार्षिक परवाना शुल्क भरण्यास विलंब करणार्या कॅसिनो चालकांना थकबाकीच्या रकमेवर वार्षिक १८ टक्के दराने दंडात्मक व्याज भरावे लागणार आहे. याखेरीज‘नामनिर्दिष्ट परवानाधारक क्षेत्र’ (डॅसिग्नेटेड लायसन्सड् एरिया) या संज्ञेची व्याख्या सुधारित करण्यात आली आहे. ‘गेमिंग’ उपक्रम केवळ पंचतारांकित हॉटेल किंवा तरंगत्या नौका यांवरील स्वतंत्र, प्रवेश-नियंत्रित आणि इतर भाग यांपासून वेगळ्या ठेवलेल्या क्षेत्रातच चालवता येणार आहे. या सुधारित नियमांची तात्काळ कार्यवाही करण्यात आली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !