महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हिंदुद्वेषी आणि पक्षपाती कारभार
– श्री. प्रीतम नाचणकर, सनातन प्रभात प्रतिनिधी, मुंबई

मुंबई, २७ ऑगस्ट (वार्ता.) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल सादर केला. मुंबईमध्ये कुठे प्रदूषण झाले, हेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. याच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील १ सहस्र १४९ मशिदींवरील अवैध भोंगे काढण्यात आल्याची माहिती दिली. हिंदूंच्या सणांमध्ये होणार्या प्रदूषणावर वार्षिक अहवालातील पानेच्या पाने खर्ची घालणार्या प्रदूषण मंडळाने मुंबईत एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या भोंग्यांचा आणि त्यामुळे होणार्या प्रदूषणाचा ओझरता उल्लेखही अहवालामध्ये केलेला नाही. यावरून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पक्षपातीपणा दिसून येतो.
🚨 Hinduphobia in Maharashtra!
The Pollution Control Board stays silent on mosque loudspeakers blaring year-round, but comes down heavily on Ganeshotsav & Diwali!
✔️ Monitoring festivals is fine; but why only target Hindus?
👉 The Board must act with integrity, not religious… pic.twitter.com/Z5oHL1MCZQ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 28, 2025

१. गंभीर गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात मुंबईतील १ सहस्र ६०८ अवैध भोंग्यांतील १ सहस्र १४९ म्हणजे एकूण ७२.६९ टक्के भोंगे मशिदींवर असल्याचे सांगितले.
२. विशेष म्हणजे वर्षभर लावण्यात येणार्या भोंग्यांमुळे होणार्या प्रदूषणाची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाने वार्षिक अहवालात दिलेली नाही; मात्र वर्षातून एकदा येणार्या गणेशोत्सव आणि दिवाळी उत्सवांत मुंबईत कुठे-कुठे प्रदूषण झाले, हे नमूद केले आहे.
३. केवळ वर्ष २०२३-२४ या अहवालातच नाही, तर मागील अनेक वर्षांपासून ‘गणेशोत्सव आणि दिवाळी उत्सवात किती प्रदूषण होते’, याची आकडेवारी प्रदूषण नियंत्रण मंडळ आवर्जून देत आले आहे.
| महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील कांही भाग –
|
४. वर्ष २०२३-२४ च्या अहवालातील आकडेवारीही राज्यातील २७ महानगरपालिकांच्या क्षेत्रात श्री गणेशोत्सवात १३२, तर दिवाळीत १५८ ठिकाणचे ध्वनी निरीक्षण करून वार्षिक अहवालात नमूद केल्याचे म्हटले आहे.
५. गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतील जल्लोषामुळे, तर दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण झाल्याचेही या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली ही आकडेवारी वस्तूनिष्ठ आहे.
अशा प्रकारे कार्यवाही करणे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कर्तव्याचाच भाग आहे; मात्र ही वस्तूनिष्ठता आणि कर्तव्यदक्षता वर्षभर ३६५ दिवस चालू असलेल्या मशिदींवरील भोंग्यांविषयी न दाखवता केवळ हिंदूंच्या सणांच्या वेळीच दाखवली जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या पक्षपाती कार्यवाहीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे, असे जनतेचे म्हणणे आहे.
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे परीक्षण करून सण-उत्सव यांच्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखायलाच हवे; मात्र केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य करायचे आणि वर्षभर चालू असलेल्या मशिदींवरील भोंग्यांकडे मात्र कानाडोळा करायचा, हे कसले धोरण ? प्रदूषण नियंत्रण मंडळाने कार्यवाही प्रामाणिकपणे करावी. धर्म पाहून नव्हे ! |

Mateen Patel : ए.आय.एम्.आय.ए.चा नगरसेवक मतीन पटेल याची पुन्हा चौकशी
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
राज्यात मुसलमानांना ५ मंत्रीपदे न दिल्यास आमची शक्ती दाखवू !
Vande Mataram : बंगालमधील मदरशांमध्ये ‘वन्दे मातरम्’ अनिवार्य करण्यावर ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’चा आक्षेप
Islam Friendly Gym : केरळम्मध्ये ‘इस्लाम फ्रेंडली’ व्यायामशाळेवरून वाद
Muzaffarpur Hospital Fire : मुझफ्फरपूर (बिहार) येथे खासगी रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू, तर २० हून अधिक घायाळ