आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले

  • पुण्यातील ‘विप्रो’मधील ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या अंतर्गत हिंदु महिलेच्या धर्मांतराचे प्रकरण

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांची माहिती

  • शाहिना बेंगळुरूतील विप्रो कार्यालयात कार्यरत

  • शाहिना अथवा ‘विप्रो’ विरुद्ध अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही !

पुणे – ‘विप्रो’मध्ये घडलेल्या धर्मांतराच्या प्रयत्नावरील प्रकरणत अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही. संबंधित मुसलमान महिला ही पुण्यातील विप्रोच्या कार्यालयात कधी आलेली नाही. ती बेंगळुरूतील कार्यालयात काम करते. तिला अन्वेषणासाठी पुण्यात बोलावले आहे, अशी माहिती हिंजवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिली.

हे प्रकरण धर्मांतराचे असल्याचे पीडित हिंदु महिलेने तक्रारीत म्हटले आहे, यावर पांढरे म्हणाले की, आरोपी महिलेची चौकशी केल्याविना यावर आम्हाला भाष्य करता येणार नाही. तसेच हा दोन्ही महिलांमधील वाद आहे. आम्ही याची पुढील चौकशी करत आहोत. विप्रोने पीडितेला त्यागपत्र देण्यास भाग पाडल्यासंदर्भात पांढरे म्हणाले की, हा विषय कामगार कायद्याच्या अंतर्गत येतो. त्याचेही अन्वेषण केले जात आहे.