
मुंबई – केंद्रशासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत एन्.सी.ई.आर्.टी.च्या ८ वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकातून अकबराचे उदात्तीकरण वगळण्यात आले आहे, तसेच औरंगजेब, बाबर, अल्लाउद्दीन खिलजी या क्रूरकर्मा मोगलांच्या अत्याचारांचा काँग्रेसने लपवलेला इतिहास देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात अद्यापही अकबराचा उल्लेख ‘जनकल्याणकारी राजा’ म्हणून करण्यात आला आहे. केंद्रशासनाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार राज्यशासनानेही नवीन अभ्यासक्रमातून क्रूरकर्मा अकबराचे उदात्तीकरण पाठ्यपुस्तकातून हटवणे आवश्यक आहे.

१. एस्.सी.ई.आर्.टी.च्या इयत्ता ४ थीच्या ‘परिसर अभ्यास – भाग २’च्या ‘शिवछत्रपती’ या पाठ्यपुस्तकामध्ये ‘शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र’ या पहिल्या पाठात प्रजेच्या कल्याणासाठी कार्य करणार्या राजांमध्ये सम्राट कृष्णदेवराय यांच्यासह मोगल सम्राट अकबर याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
२. या पाठानंतर देण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये ‘प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणार्या राजांची नावे लिहा’ अशा एका वाक्यातील उत्तराचा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी सम्राट कृष्णदेवराय यांच्यासह क्रूरकर्मा अकबराचे नाव ‘कल्याणकारी राजा’ म्हणून लिहित आहेत.
३. यामुळे अकबराने हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचा वस्तूनिष्ठ इतिहास आणि सत्य पुढे येण्याऐवजी विद्यार्थीदशेपासून खोटा इतिहास बिंबवला जात आहे. या पाठ्यपुस्तकामध्ये काँग्रेस सरकारने मोगलांचा क्रूरकर्मा इतिहास लपवून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
📚 Even after NCERT corrected its syllabus, Maharashtra’s 4th Std SCERT textbook still glorifies Akbar as a “benevolent king” (Kalyankari Raja).
❌ Mughal atrocities? Whitewashed.
❌ Sant Ramdas’ verse? Half-printed.
❌ History panel? Headed by an anti-Hindu figure handpicked by… pic.twitter.com/AjIYA0au1K— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 24, 2025
पाठ्यपुस्तकात समर्थ रामदासस्वामी यांचा श्लोक अर्धवट
या पाठ्यपुस्तकातील ‘संतांची कामगिरी’ या दुसर्या पाठामध्ये महाराष्ट्रातील काही संतांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये समर्थ रामदासस्वामी यांच्याविषयी दिलेल्या माहितीमध्ये ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे’ हा समर्थ रामदासस्वामी यांचा श्लोक अर्धवट दिला आहे. ‘परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान मात्र पाहिजे’ हा श्लोकातील पुढील भाग दिलेला नाही. त्यामुळे समर्थ रामदासस्वामी यांच्या संदेशाचा अर्थबोध होत नाही. काँग्रेस सरकारच्या काळात वर्ष २०१४ मध्ये या पाठ्यपुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती. पुढे महायुती सरकारच्या काळात सप्टेंबर २०१६ मध्ये सुधारित आवृत्ती आणि सप्टेंबर २०२१ मध्ये या पाठ्यपुस्तकाचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे.
हिंदुद्वेषी डॉ. आ.ह. साळुंखे यांची इतिहास विषय समितीमध्ये निवड !

या पाठ्यपुस्तकाच्या इतिहास विषय समितीचे अध्यक्ष म्हणून तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने हिंदु धर्मावर सातत्याने गरळओक करणारे डॉ. आ.ह. साळुंखे यांची नियुक्ती केली होती. ‘या पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांना सर्वधर्मसमभाव जपणारे दाखवणे, मोगलांचे क्रौर्य लपवणे आदी जाणीवपूर्वक करण्यात आले आहे का ?’, अशी शंका जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
सुधारित अभ्यासक्रमाचे काम प्रगतीपथावर ! – शिक्षण विभाग
याविषयी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागातील अधिकार्यांना संपर्क केला असता केंद्रशासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सुधारीत अभ्यासक्रमाचे काम चालू आहे. सुधारीत अभ्यासक्रमाचे काम पूर्ण झाल्यावर तो संकेतस्थळावरून प्रसिद्ध केला जाईल आणि जनतेच्या सूचना मागवण्यात येतील. त्यानुसार सुधारीत अभ्यासक्रमात आवश्यक ते पालट करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
नवीन अभ्यासक्रमातील सुधारणांची अद्याप माहिती नाही ! – एस्.सी.ई.आर्.टी.

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने एस्.सी.ई.आर्.टी. अधिकार्यांशी संपर्क केला असता ‘नवीन अभ्यासक्रमानुसार केंद्रशासनाकडून राज्यशासनाला सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे अभ्यासक्रमात अवश्य दुरुस्त्या केल्या जातील; मात्र कोणत्या सुधारणा केल्या जाणार आहेत, याविषयीची माहिती अद्याप आम्हाला प्राप्त झालेली नाही.
राष्ट्रप्रेमी नागरिकांना आवाहन !शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भारतीय संस्कृतीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्या दृष्टीने नवीन अभ्यासक्रम सिद्ध झाल्यावर त्याविषयी जनतेकडून हरकती अवश्य मागवल्या जातील; परंतु अभ्यासक्रम सिद्ध करतांनाच काँग्रेस सरकारच्या काळात देण्यात आलेला चुकीचा इतिहास रहित व्हावा, यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला अवश्य कळवा. |
पत्रव्यवहारासाठी पत्ता : प्रधान सचिव, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२
या PDF चा सखोल अभ्यास करून राष्ट्रप्रेमी आवश्यक सुधारणा शिक्षण विभागाला वरील पत्त्यावर पाठवू शकतात.
संपादकीय भूमिकादिशाभूल करणारा अभ्यासक्रम त्वरित हटवून युवा पिढीवर राष्ट्रीयत्वाचा संस्कार करणारा अभ्यास महायुती सरकारने त्वरित लागू करावा ! |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !
नाशिकमध्ये पहिल्याच पावसात खोदलेल्या रस्त्यांवर चिखल !
महानगरपालिकेच्या कर्मचार्याला १० सहस्र रुपयांची लाच घेतांना पकडले !