‘पाकिस्तानमध्ये सुंदर हिंदु मुलगी किंवा स्त्रीचे बलपूर्वक अपहरण केले जाते. नंतर तिच्याशी लग्न करून तिच्यावर अत्याचार केले जातात. उपभोग घेऊन झाल्यानंतर तिची हत्या केली जाते. तेथे हिंदु पुरुषाच्या प्राणाचेही मोल शून्य आहे. त्यामुळे तेथील हिंदू सतत भयप्रद वातावरणात जगत असतात. अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांच्याकडे भारतात स्थलांतरित होणे, हा एकमेव पर्याय असतो. अशा वेळी तेथील हिंदूंना पाकिस्तानातून अधिकृतपणे बाहेर काढून भारतात नवजीवन देण्याचे दिव्य कार्य भारतातीलच डॉ. ओमेंद्र रत्नू करत आहेत. त्यांनी वर्ष २०१२ मध्ये पाकिस्तानी हिंदूंच्या रक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी श्री. जय आहुजा यांच्यासह ‘निमित्तेकम्’ या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून डॉ. रत्नू हे पाकिस्तानातील अत्याचारग्रस्त हिंदूंंना भारतात सुरक्षितपणे आणण्याचे मानवीय कार्य करत आहेत.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. डॉ. ओमेंद्र रत्नू यांचा परिचय
डॉ. ओमेंद्र रत्नू हे कान, नाक आणि घसा तज्ञ आहेत. ते गेल्या १५ वर्षांपासून त्यांचे रुग्णालय चालवत आहेत. त्यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथील एका क्षत्रिय कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा राजस्थानी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी डॉ. रत्नू यांच्यामध्ये मातृभूमी आणि धर्म यांविषयी प्रेम निर्माण केले. त्यांचे वडील सुप्रसिद्ध मूत्रपिंड तज्ञ (नेफ्रॉलॉजिस्ट) आणि धर्माभिमानी हिंदु होते. त्यामुळे राष्ट्र, धर्म आणि संस्कृती यांविषयीचे प्रेम डॉ. रत्नू यांच्यामध्ये वारसानेच चालत आले आहे. यासंदर्भातील विषयावर ते वर्तमानपत्रे आणि ‘वेब पोर्टल’ यांमध्ये स्तंभलेखन करतात. त्यांना राजस्थानच्या इतिहासाविषयी उत्सुकता आहे. त्यांनी मेवाडच्या इतिहासावर अनेक लेख लिहिले आहेत. त्यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या दुर्दशेवर छोटेसे पुस्तकही लिहिले आहे.

२. ‘निमित्तेकम्’ नावाचा अर्थ
‘निमित्तेकम्’चा अर्थ ‘निमित्तमात्र अस णे’, असा आहे. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत अर्जुनाला, ‘…निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ।’, अशी शिकवण दिली आहे. त्याचा अर्थ ‘तू केवळ निमित्तमात्र हो’, असा आहे. त्याप्रमाणे डॉ. रत्नू यांचा भाव आहे. ईश्वराची सेवा म्हणून ते हे कार्य करत आहेत.

______________________________
३. निर्वासित हिंदूंच्या पुनर्वसनाकडे कसे जोडले गेले ?
डॉ. रत्नू हे राजस्थानमधील आहेत. त्यामुळे पाकिस्तानातून येणारे निर्वासित हिंदू त्यांना भेटत असत. त्यांच्याकडून पाकिस्तानातील हिंदूंच्या धक्कादायक व्यथा त्यांना ऐकायला मिळायच्या. प्रारंभी डॉ. रत्नू त्यांना आर्थिक साहाय्यही करायचे. वर्ष २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने त्याच्या निवडणूक घोषणापत्रात पाकिस्तानी हिंदूंचे सूत्र उपस्थित केले. त्यामुळे त्यांना पाकिस्तानी हिंदू स्थलांतरितांसाठी कार्य करणे थोडे सुलभ झाले.
४. १४ सहस्र हिंदूंना भारतात सन्मानाने आश्रय

भारतात १०० कोटी हिंदू रहातात; पण त्यांच्यापैकी किती जणांना पाकिस्तानातील पीडित हिंदूंविषयी आत्मीयता वाटते ?, हा प्रश्नच आहे. ज्या हिंदूंना भारतात यायचे आहे, ते निमित्तेकम्’शी संपर्क साधतात. ही संस्था त्यांची कागदपत्रे सिद्ध करणे, त्यांच्यासाठी प्रायोजक शोधणे, राजपत्रित अधिकार्याकडून त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळवणे; पोलीस, गुप्तचर अधिकारी यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतर त्यांना इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयात पाठवणे, अशी कामे करते. तेथे व्यक्तीला ‘व्हिसा’ मिळतो आणि नंतर अटारी सीमा ओलांडून सन्मानाने भारतात प्रवेश दिला जातो. मागील १० वर्षांत निमित्तेकम्’च्या माध्यमातून डॉ. रत्नू यांनी १४ सहस्र पाकिस्तानी हिंदूंना भारतात प्रवेश मिळवून दिला आहे. अद्यापही पाकिस्तानात लक्षावधी हिंदू आहेत, जे तेथील नरकासमान वातावरणात जीवन कंठत आहेत.
५. नागरिकत्व सुधारणा कायदा (सी.ए.ए.) प्रभावी करण्याची आवश्यकता !
‘सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (सी.ए.ए.) त्वरित लागू करावा’, असे डॉ. रत्नू यांना वाटते. हा कायदा झाल्यास त्यांचे कार्य अधिक सुकर होणार आहे. ‘मोदी सरकारने पाकिस्तानातील हिंदूंच्या वेदना समजून घ्याव्यात आणि हा कायदा प्रभावी करून त्वरित कार्यवाही करावी’, अशी त्यांची अपेक्षा आहे. डॉ. रत्नू एक पुस्तक लिहित आहे. त्यात पाकिस्तान आणि बांगलादेश येथील पीडित हिंदूंना त्वरित वाचवण्याची आवश्यकता विषद केली आहे.
Call For A Pakistani Hindus Rehabilitation Board | Powerful Interview with Dr. Omendra Ratnu🚩 A Historic Demand for Hindu Survival & Dignity! 🚩 A strong voice has emerged from Mahakumbh 2025, calling for the formation of a Hindu Rehabilitation Board. This initiative aims to protect displaced Hindus, restore their rights, and ensure their socio-economic upliftment. Yes! Sanatan Prabhat interviewed Dr. Omendra Ratnu, an ENT surgeon by profession and the founder of “Nimittekam”, an organization which works for the benefit of Pakistani Hindus. Dr. Ratnu shed light upon… 🔸 Why is a Hindu Rehabilitation Board necessary? Really a powerful eye-opener by Dr. Ratnu! 🔥 Watch this crucial discussion and join the movement for Hindu justice! 📢 Like, Share & Subscribe for more updates on Hindu rights and Sanatan resurgence! |
६. पाकमधील हिंदूंना भारतात आणण्याचे महादिव्य कार्य
पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक घोषणापत्रात पाकिस्तानातील हिंदूंना भारतात नागरिकत्व देण्याचे सूत्र समाविष्ट केले होते. त्यामुळे हे कार्य करणे सुलभ होते. तेथील हिंदूंना भारतात येण्याच्या दृष्टीने प्रायोजक होण्यासाठी कुणीही सिद्ध नसते. भारतात स्थायिक झालेले पाकिस्तानी हिंदू त्यासाठी प्रायोजक होतात. डॉ. रत्नू हे नागरिकत्वाच्या व्हिसाच्या अर्जावर राजपत्रित अधिकार्याची स्वाक्षरी घेण्यासाठी वैयक्तिक परिचय किंवा कट्टर हिंदुत्वनिष्ठ यांचे साहाय्य घेतात. नव्या कायद्यामुळे नागरिकत्वाची कागपदत्रे पाकिस्तानात प्रत्यक्ष टपालाने पाठवावी लागतात. भारतातून पाकिस्तानात प्रत्यक्षपणे टपाल जात नाही. त्यामुळे ते दुबईमार्गे पाठवावे लागते, तसेच प्रत्येक अर्जामागे ५०० रुपये व्यय करावा लागतो. सर्व प्रक्रिया पार पडल्यावरही भारतीय दूतावासातील अधिकारी व्हिसा देण्यात कुचराई करतात. अनेक दिव्यांतून पार पडल्यावर पाकमधील पीडित हिंदू अधिकृतपणे भारतात येऊ शकतात. त्यामुळे डॉ. रत्नू यांच्यासाठी ही सर्व प्रक्रिया म्हणजे मोठी तपश्चर्याच आहे.
डॉ. ओमेंद्र रत्नू यांची पुस्तके
हे वाचा → महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवराय यांच्याविषयी खरा इतिहास लिहावा ! – डॉ. ओमेंद्र रत्नू, लेखक |
७. भारतीय हिंदूंच्या आर्थिक साहाय्यावर पाकिस्तानी हिंदूंचे पुनर्वसन
पाकमधील पीडित हिंदूंचे भारतात पुनर्वसन करण्यासाठी सरकार आर्थिक साहाय्य देत नाही. हिंदुत्वनिष्ठांच्या पैशावर हे कार्य चालते. पाकिस्तानातून येणारे हिंदू हे दलित, भील, मेघवाल, कोली, राजपूत आदी समाजातील आहेत. त्या त्या समाजातील हिंदूंना त्या त्या समाजाच्या विस्थापितांकडे सुपुर्द करण्यात येते. जातीबांधव म्हणून ते त्यांची काळजी घेतात. सध्या पाकमधील स्थलांतरित हिंदूंसाठी वेगळे गाव वसवण्याचे डॉ. रत्नू यांचे प्रयत्न आहेत.
| भेट द्या → ♦ Nimittekam फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/Nimittekam/ ♦ Nimittekam (Working for Pakistani Hindus) https://x.com/Nimittekamindia |
८. सरकारने पाकिस्तानातील हिंदूंच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र मंडळ नेमावे ! – डॉ. ओमेंद्र रत्नू
पाकमध्ये ३ कोटी हिंदूंचे एका संस्थेच्या माध्यमातून भारतात पुनर्वसन करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी सरकारने एका मंडळाची (बोर्डाची) स्थापना करावी. त्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करून किमान ५ सहस्र कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ठेवणे आवश्यक आहे. विस्थापितांसाठी स्वतंत्र वसाहत असावी. त्यामुळे त्यांना मुलभूत सुविधा पुरवणे शक्य होईल, असे डॉ. रत्नू यांना वाटते.
| हे वाचा →
♦ पाकिस्तानी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन यांसाठी प्रयत्नरत असलेले डॉ. ओमेंद्र रत्नू ! |

राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !