भारतीय परंपरा, इतिहास आणि संस्कृती यांचे वैभव आधुनिक माध्यमांद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचा एक सशक्त प्रयत्न म्हणजे ‘स्ट्रिंग रिव्हील्स’. या चॅनेलमागील प्रभावशाली व्यक्तीमत्त्व, म्हणजे श्री. विनोद कुमार. ते भारतीय धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास आणि राजकारण यांच्याशी संबंधित सखोल संशोधनावर आधारित अचूक माहिती जनतेपर्यंत पोचवत आहेत.

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. व्यावसायिक जीवन आणि शिक्षण
श्री. विनोद कुमार यांनी त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीचा प्रारंभ ‘व्ही.एफ्.एक्स’ (व्हिज्युअल इफेक्ट – दृश्य कला), ‘ॲनिमेशन’ (दृक्श्राव्य माध्यम बनवण्याची एक संगणकीय प्रणाली) आणि व्हिडिओ संपादन क्षेत्रातून केला. त्यांच्या या तांत्रिक पार्श्वभूमीचा प्रभाव त्यांच्या व्हिडिओंच्या दृष्टीकोनात, ‘ग्राफिक्स’मध्ये (व्हिडिओमध्ये वापरण्यात येणार्या प्रतिमा किंवा चित्रे) आणि सादरीकरण यांत स्पष्टपणे दिसून येतो. त्यांनी त्यांचे तांत्रिक शिक्षण ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वारंगल’ (तेलंगाणा) येथे पूर्ण केले आहे.
‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने हिंदु आणि राष्ट्र हित यांसाठी केलेले कार्य !

‘यू ट्यूब’वर १४ लाखांहूनही अधिक अनुयायी (फॉलोअर्स) असणार्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने आतापर्यंत साधारण २५० अत्यंत अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवले आहेत. यांपैकी काही व्हिडिओजना कोट्यवधी दर्शकसंख्या लाभली आहे. ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ भारत, तसेच हिंदु धर्म यांच्या विरोधात कार्य करणार्यांचा भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
| हे ही वाचा →
♦ BBC on Trial : ‘बीबीसी’चा बुरखा फाडणारी डॉक्युमेंट्री ‘बीबीसी ऑन ट्रायल’ प्रसारित ! ♦ प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर अन्याय्य बंदी ! |
चॅनेलच्या नावानुसार ते कोणत्याही घटनेमागील षड्यंत्राचा ‘धागा उलगडून’ व्हिडिओच्या माध्यमातून जगासमोर ठेवते. भारतात घडणार्या महत्त्वाच्या घटनांमागे भारतविरोधी शक्ती कशा प्रकारे कार्यरत आहेत ?, या संदर्भातील संपूर्ण वस्तूनिष्ठ माहिती दिली जाते. यामध्ये २ वर्षांपूर्वी झालेल्या देहलीतील कथित शेतकरी आंदोलन असो अथवा कर्नाटकातील हिजाबविरोधी आंदोलन असो किंवा मणीपूर आणि नूंह (हरियाणा) येथील हिंसाचार असो, या सर्व घटनांमागील आंतरराष्ट्रीय राजकारण, धर्मनिरेपक्षतावादी शक्तींचा सहभाग, हिंदूंवरील आरिष्ट आदी गोष्टी प्रखर आणि स्पष्टपणे मांडल्या गेल्या आहेत. ईश्वरी अधिष्ठान घेऊन कार्य करण्याच्या सूत्रावरही या चॅनेलच्या माध्यमातून वेळोवेळी दिशादर्शन केले जाते.
२. ‘स्ट्रिंग रिव्हील्स चॅनेल’ म्हणजे धर्म आणि संस्कृती यांना जोडणारा दुवा
‘स्ट्रिंग रिव्हील्स’ हे यू ट्यूब चॅनेल एक अनोखे व्यासपीठ आहे, जिथे श्री. विनोद कुमार हे हिंदु धर्म, पुराणकथा, खरा इतिहास आणि भारतीय तत्त्वज्ञान यांवर आधारित विश्लेषणात्मक व्हिडिओ सादर करतात. या माध्यमातून ते ज्ञानाच्या शोधात असलेले संशोधक आणि सामान्य प्रेक्षक यांना एकाच व्यासपिठावर आणण्याचे कार्य अविरत करत आहेत.
‘वर्ल्ड हिंदू काँग्रेस’मध्ये बोलतांना . . .
M Vinodh Kumar at Hindu Media Conference, WHC 2023 Bangkok
(सौजन्य : World Hindu Congress)
ते स्वतः व्हिडिओंसाठी विश्वसनीय स्रोतांवर आधारित सखोल संशोधन करतात. त्यांच्यात गुंतागुंतीच्या विषयांना सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने मांडण्याची क्षमता आहे, ज्यामुळे सामाजिक माध्यमांमध्ये ते धर्मरक्षणासाठी एक आवाज बनले आहेत.
‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर यू ट्यूबने लादली बंदी !

हिंदु आणि भारत विरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यू ट्यूब चॅनेलवर यू ट्यूबने बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यू ट्यूबने सांगितले, ‘या चॅनलने त्यांच्या नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केले आहे.’ यू ट्यूबने आतापर्यंत कधीच अशा प्रकारे त्यांना एखाद्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या विरोधात चेतावणी दिली नाही; थेट त्यांच्यावर प्रतिबंध लादण्याची अन्याय्य कारवाई केली. याविषयी ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने म्हटले आहे, ‘यू ट्यूबने कुणाचे मन राखण्यासाठी ही कारवाई केली. आम्ही तुमच्या विरोधात पुष्कळ दूरपर्यंत जाऊन लढू शकतो, हे तुम्ही विसरू नका, तसेच अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी केवळ यू ट्यूब हे एकच माध्यम नाही, हेसुद्धा ध्यानात असू द्या !’
३. सामाजिक माध्यमे आणि लोकप्रियता
श्री. विनोद कुमार यांचे योगदान केवळ त्यांच्या यू ट्यूब चॅनेलपुरते मर्यादित नसून ते ‘एक्स’, ‘इन्स्टाग्राम’ आणि इतर प्लॅटफॉर्म्सवरही सक्रीय आहेत. भारतासमोर उभे असलेली अंतर्गत आणि बाह्य आव्हाने यांवर ते धाडसाने अन् प्रामाणिकपणे स्वतःचे मत व्यक्त करतात.
‘बीबीसी’चा हिंदुद्वेष उघड करण्यासाठी ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’ आणि ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ यांच्याकडून लघुचित्रपट प्रसारित !

‘बीबीसी’, म्हणजेच ‘ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ ही वृत्तवाहिनी हिंदुद्वेषाने पछाडलेली असून भारत आणि हिंदू यांच्याविषयी खोटी कथानके प्रसृत करण्यासाठी ती कुप्रसिद्ध आहे.
| Who Controls the World? | BBC on Trial – Full Documentary
(सौजन्य : Prachyam) |
अशा बीबीसीच्या विरोधात प्रथमच एक अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ‘डॉक्युमेंट्री’ (लघुचित्रपट) २५ ऑक्टोबर २०२४ या दिवशी प्रसारित करण्यात आली. ही डॉक्युमेंट्री ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’ आणि ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संयुक्त विद्यमाने बनवलेली आहे.
श्री. विनोद कुमार यांचे कार्य आजच्या पिढीला भारतीय इतिहास आणि संस्कृती यांची जाणीव करून देत आहे. त्यांनी व्हिडिओ तंत्रज्ञान आणि संशोधन कौशल्य यांचा संगम साधून धर्म अन् देशभक्ती यांच्या विचारांना नवी दिशा दिली आहे. ते समाजासाठी धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणाच्या कार्यात एका मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करत आहेत.

अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !
मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ
धर्म आणि संस्कार यांची महती अन् हिंदु पालकांचे दायित्व
‘एकल अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात परिवर्तन !
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !