Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड

अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ८ आरोपींच्या घरी पोलिसांनी २८ जूनच्या सकाळी एकाच वेळी धाड टाकली. यांपैकी ३-४ आरोपींची घरे बंद आढळली; पोलिसांनी त्यांच्या शेजार्‍यांकडे चौकशी केली आणि इतर आरोपींच्या कुटुंबियांचीही विचारपूस केली.

आरोपी अनुकल्प मिश्रा याच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तिथे सध्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि बँक खात्यांचा तपशील पडताळला जात आहे. कुटुंबियांचे जबाब नोंदवले जात आहेत. या धाडीमध्ये महसूल विभागाचे अधिकारी, विशेषतः महसूल लेखापाल यांचाही समावेश करण्यात आला आहे.