Ghaziabad  Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !

(मजार म्हणजे मुसलमान फकीराचे थडगे) 

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे सरकारी भूमीवर बांधण्यात आलेली ३ मजली ‘मजार’ प्रशासनाकडून बुलडोझरद्वारे पाडण्यात आली. अनेक नोटिसा देऊनही बेकायदेशीर बांधकाम न हटवल्यामुळे अंततः हे पाडकाम करण्यात आले. (या पाडकामाचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यासह अतिक्रमण करणार्‍यांना कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक) या कारवाईच्या वेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (पोलीस बंदोबस्त का ठेवावा लागतो ? बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास कोण विरोध करत असतात ? अशांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक)

प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे बांधकाम वर्ष २००१ मध्ये एका छोट्या संरचनेने चालू झाले होते. पुढे वर्षे गेली, तसे आजूबाजूच्या भूमीवरही अतिक्रमण केले गेले. २५ वर्षांत हे बांधकाम ३ मजल्यांपर्यंत पोचले. या भूमीचे मूल्य दीड कोटी रुपये आहे. (२५ वर्षांपर्यंत प्रशासनातील कोण कोण झोपले होते, त्यांची सूची बनवून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)