Karnataka Muharram : मुळगुंद (कर्नाटक) येथील गावात एकही मुसलमान नसतांना हिंदू साजरा करतात मोहरम !

मुळगुंद (कर्नाटक) – येथील बासापूर गावात एकही मुसलमान रहात नाही, तरीही  शेकडो वर्षांपासून हिंदू शिया मुसलमानांचा मोहरम सण साजरा करत आहेत. मोहरम जवळ येताच गावातील प्रत्येक घर स्वच्छ केले जाते. ग्रामस्थांकडून देणगी गोळा करून सण साजरा केला जातो. गावात ‘पंजा’ (अलाई देव) स्थापित करून त्याची सलग ५ दिवस पूजा केली जाते. मोहरमच्या शेवटच्या दिवशी पंजाची मिरवणूक काढून त्याला विसर्जित केले जाते.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांची धर्माविषयीची स्थिती किती दयनीय आहे, याचे हे सर्वांत मोठे उदाहरण म्हणावे लागेल ! हिंदु संघटना आणि धार्मिक संस्था यांनी अशा हिंदूंचे तातडीने प्रबोधन करून त्यांना यातून बाहेर काढले पाहिजे !