अल्पवयीन हिंदु मुलींवर अत्याचार करणार्‍या धर्मांध समीर मणेर याच्यावर गुन्हा नोंद !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना उघडकीस

उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांना निवेदन देतांना आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-बजरंग दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सामाजिक माध्यमांद्वारे अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार करणार्‍या धर्मांध समीर मणेर याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ही माहिती समजल्यावर मणेर ज्या परिसरात रहातो, त्या साखरपे रुग्णालयाच्या परिसरात हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने जमा झाले होते.

धर्मांध समीर मणेर याच्यावर कठोर कारवाई करा !

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-बजरंग दल यांची पोलिसांकडे मागणी

इचलकरंजी येथील साखरपे रुग्णालयाच्या जवळ रहाणार्‍या धर्मांध समीर मणेर याने अनेक अल्पवयीन हिंदु मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक गप्प राहिले; मात्र २७ जूनला काही जागरूक नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला. तरी संबंधित आरोपीस कठोर शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद-बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी उपविभागीय पोलीस अधीकारी विक्रांत गायकवाड यांना निवेदन सादर केले.

या प्रसंगी जिल्हामंत्री श्री. पंढरीनाथ ठाणेकरे, जिल्हा संपर्कप्रमुख श्री. संतोष हत्तीकर जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, जिल्हा सहमंत्री श्री. आनंदा मकोटे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवांनद स्वामी आणि श्री. महेंद्र अहिरे, श्री. रमेशकुमार जैन, महिला आघाडीच्या हर्षिता शेखावत, साधना डांगे यांसह अन्य उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना पहाता यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कठोर कायद्याची आवश्यकता आहे !