मध्यप्रदेशातील भाजप सरकारमधील नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे विधान

भोपाळ (मध्यप्रदेश) – रा.स्व. संघात लोकांची गर्दी तर झाली आहे; पण चांगल्या लोकांची कमतरता आहे. आधी चांगले लोक होते, आता अशा लोकांची संघात कमतरता आहे. संघटना वाढत आहे, विचारधाराही वाढत आहे; पण चांगले लोक नसतील, तर या विचारधारेचे महत्त्व काय ? आपण चिंतन आणि मनन केले पाहिजे, असे विधान मध्यप्रदेशाचे नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी येथे केले. ते शालिगराम तोमर स्मृती कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव हेही उपस्थित होते.
कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले की, आमचा पक्ष फार मोठा बनला आहे. जो अधिकारी येतो, तो म्हणतो की, मी पण संघाची पट्टी बांधली आहे. संघाची चड्डी घातली आहे. एका अधिकार्याने मला सांगितले की, ‘माझे वडील संघात जात होते.’ कुणी म्हणतो की, ‘माझे वडील संघात अध्यक्ष होते.’ सरकार आल्यानंतर सर्व अधिकारी संघाचे झाले आहेत. भाजपचे सरकार आल्यानंतर अधिकारीही स्वतःला संघाशी संबंधित असल्याचे सांगू लागले आहेत.
फोर्ट (मुंबई) येथील शासकीय जागेच्या प्रकरणी चर्चला जिल्हाधिकार्यांकडून थकित पैशांच्या वसुलीची नोटीस !
Foreign Universities In India : १५ विदेशी विद्यापिठांना भारतात शाखा चालू करण्यास संमत्ती
Ghaziabad Mazar Demolished : गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे अतिक्रमण करून बांधलेली ३ मजली मजार भुईसपाट !
इंधन बचत करा आणि सोने खरेदी मर्यादित ठेवा ! : Narendra Modi
केरळम्मध्ये जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने पोलीस ठाण्यातूनच चोरीला !
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती