अल्पवयीन मुलींना अमली पदार्थाच्या बहाण्याने अडकवून लैंगिक शोषण
पाकिस्तानी आणि सीरिया येथील नागरिकांना अटक
(ग्रूमिंग गँग म्हणजे लहान मुली किंवा तरुणी यांनी जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करणारी टोळी)

बर्लिन (जर्मनी) – जर्मनीच्या नूर्नबर्ग येथे महिला आणि मुली यांचे लैंगिक शोषण करणे आणि त्यांना अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकवल्याच्या आरोपाखाली २ पाकिस्तानी नागरिकांना जर्मनीच्या पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ६ लोकांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये २ पाकिस्तानी आणि सीरियाचे ४ नागरिक यांचा समावेश आहे. युनायटेड किंगडमध्ये ग्रुमिंग गँगच्या टोळीने सहस्रो मुलींवर लैंगिक अत्याचार केले. या टोळीमध्ये पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
१. हे लोक नूर्नबर्ग रेल्वे स्थानकाच्या आजूबाजूच्या परिसरात मुली आणि महिला यांचा विश्वास संपादन करायचे आणि नंतर त्यांना अमली पदार्थांच्या व्यवसायात ढकलायचे. हे लोक त्यांचे लैंगिक शोषणही करायचे आणि नंतर अमली पदार्थांचे व्यसन लावून त्यांच्याकडून त्याची तस्करी करून घ्यायचे. नूर्नबर्ग सेंट्रल स्टेशनच्या आजूबाजूच्या ‘ग्रूमिंग गँग’चा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस त्यांचा पूर्वइतिहास तपासण्यात गुंतले आहेत. यासाठी मे महिन्यात एका अन्वेषण आयोगाची स्थापना करण्यात आली होती.
२. मे २०२६ मध्ये गोस्टेनहोफ जिल्ह्यातील एका अपार्टमेंटमधून पोलिसांनी अशाच एका ग्रूमिंग गँगच्या २ आरोपींना अटक केली. हे दोघेही सीरियाचे नागरिक आहेत. त्यांचे वय अवघे २६ वर्षे आणि २४ वर्षे आहे. २६ वर्षांचा हा ग्रूमिंग गँगचा सदस्य अल्पवयीन मुलींना अमली पदार्थांचा पुरवठा करायचा. सीरियाचा २४ वर्षीय नागरिक अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी आढळला आहे.
पाकिस्तान, सीरिया, गाझा, सर्बिया येथील नागरिकांवर कडक नजर
गेल्या काही वर्षांत सीरिया, पाकिस्तान, सर्बिया आणि गाझा पट्टी येथून आलेल्या निर्वासितांवर अन्वेषण आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. संशयित १८ ते ३५ वर्षांचे आहेत. १४ वर्षांपेक्षा अल्प वयाची मुले आणि किशोरवयीन यांचे लैंगिक शोषण आणि बलात्काराची प्रकरणे यांचे प्रमाण देशात झपाट्याने वाढले आहे. ‘पीडितांची संख्या आधीच्या अंदाजापेक्षा अधिक असू शकते’, असे अन्वेषण करणार्यांचे मत आहे. सध्या अधिकार्यांनी या गँगची शिकार ठरलेल्या मुली किंवा महिला यांचा अंतिम अधिकृत आकडा घोषित केलेला नाही.
युरोपमधील अनेक देशांमध्ये, विशेषतः जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स आणि बेल्जियम येथे गेल्या काही वर्षांत संघटित ग्रूमिंग जाळे समोर आले आहे. या प्रकरणांमध्ये सामान्य पॅटर्न असा आढळला आहे की, हे लोक असहाय्य, गरीब आणि असुरक्षित अल्पवयीन मुलींना आधी विश्वासात घेतात, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात आणि नंतर नशा, धमक्या किंवा भावनिक दबाव यांच्या माध्यमातून त्यांचे शोषण करतात.
Ram Temple Raid : श्रीराममंदिरातील दान चोरीतील ८ आरोपींच्या घरी पोलिसांची धाड
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती
.. तर इराणचे अस्तित्वच संपवून टाकू ! : Donald Trump Threatens Iran
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !