डॉनल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी
युद्धबंदीनंतरही अमेरिकेकडून इराणच्या १० सैन्य ठिकाणांवर आक्रमण
अमेरिकेच्या कुवेत आणि बहरीन येथील सैनिकी तळांवर प्रत्युत्तरात आक्रमण

वॉशिंग्टन (अमेरिका) – इराणने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अमेरिकेने पुन्हा एकदा इराणच्या १० मुख्य सैनिकी ठिकाणांवर आक्रमण केले असून राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सामाजिक माध्यमांवर याविषयी माहिती दिली. ट्रम्प यांनी लिहिले की, अमेरिकी लढाऊ विमानांनी इराणमधील क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि कोस्टल रडार सिस्टीम तैनात असलेल्या १० ठिकाणांना लक्ष्य केले. इराणने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करावी लागली. आम्ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला; मात्र सुधारणा झाली नाही, तर अमेरिका मोठ्या सैनिकी कारवाईसाठी सज्ज आहे. जर तसे झाले, तर ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’चे अस्तित्व कायमचे मिटवून टाकू, अशी धमकीही ट्रम्प यांनी दिली.
आक्रमणाविषयी माहिती देतांना यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे की, २७ जूनला सकाळी इराणच्या एका ड्रोनने पनामाचा ध्वज असलेल्या व्यापारी नौकेवर आक्रमण केले होते. या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणच्या सैनिकी देखरेख, दळणवळण, हवाई संरक्षण आणि ड्रोन साठवणूक केंद्रांवर आक्रमण केले.
नरकयातना भोगाव्या लागतील ! – इराणची चेतावणी
अमेरिकेच्या आक्रमणाला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्ब्सने (‘आय.आर्.जी.सी.’ने) २८ जूनच्या पहाटे कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकी सैन्याच्या तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन यांद्वारे भीषण आक्रमण केले. इराणने अमेरिकेसह संपूर्ण आखाती देशांना ‘येत्या काही दिवसांत नरकयातना भोगाव्या लागतील’, अशी थेट धमकी दिली आहे. तसेच ‘अमेरिकेने सिरीक बेटावर केलेल्या आक्रमणांमुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण अल्प होणार नाही. सागरी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक कारवाई करून सुरक्षित वाहतुकीचे नियम अधिक कडक केले जातील’, असेही आय.आर्.जी.सी.ने म्हटले आहे.
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार
Germany Grooming Gangs : जर्मनीमध्येही यूकेसारखी ‘ग्रूमिंग गँग’ !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी