१५ सहस्र जणांना मारण्याचा डाव होता  ! – आरोपी फैय्याजची स्वीकृती

मोहरमच्या मिरवणुकीतील प्रकरण

आरोपी फैय्याज

मुंबई – फैय्याज नावाच्या ३९ वर्षीय इसमाने मोहरमच्या मिरवणुकीत मुंबईत वेदनाशामक गोळ्यांच्या नावाखाली ‘झिंक फॉस्फाईड’ भरलेल्या कॅप्सुल (गोळ्या) वाटण्याचे नियोजन केले होते. मुंबई पोलिसांनी त्याला भायखळा येथे २७ जून या दिवशी अटक केल्यावर त्याने १५ सहस्र लोकांना मारण्याचा कट होता, अशी स्वीकृती दिली आहे. फैय्याजकडून १४ सहस्र ९०० कॅप्सुल कह्यात घेण्यात आल्या आहेत.

‘झिंक फॉस्फाईड’ हे अत्यंत विषारी रसायन आहे. त्यामुळे विषबाधा, अवयव निकामी होणे आणि मृत्यूही होतो. येथील मिरवणुकीत सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाने त्याला कॅप्सुल वाटतांना पाहिले आणि त्याला संशय आल्याने त्याने त्याला कह्यात घेतले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मिरवणुकीतील एका व्यक्तीला ही कॅप्सुल घेतल्यावर उलट्या आणि पोटदुखी चालू झाली होती.

फैय्याज पुण्यातील विमाननगर येथे रहाणारा आहे. या प्रकरणी आणखी कोण सहभागी आहे, यामागील यंत्रणा, डिजिटल यंत्रणा, रासायनिक पदार्थ आदी सर्व गोष्टींविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत.