तुळजापूर मंदिरातील सशुल्क दर्शन पास बंद करण्यासाठी पुजारी मंडळाचे धरणे आंदोलन !

  • धार्मिक गोष्टींत प्रशासकीय अधिकार्‍यांचा हस्तक्षेप अयोग्य असल्याचे मत

  • भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित निर्णय घेतांना पारदर्शकता ठेवण्याची मागणी !

लाक्षणिक धरणे आंदोलन करतांना पुजारी मंडळ

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिरातील सशुल्क दर्शन पास पद्धतीमुळे भाविकांत भेदभाव निर्माण होतो, असा आरोप करत ही व्यवस्था तात्काळ बंद करण्याची मागणी पुजारी मंडळांनी केली आहे. मंदिर संस्थानच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पुजारी मंडळाने मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयासमोर २७ जून या दिवशी लाक्षणिक धरणे आंदोलन केले. या वेळी सर्वश्री माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, सचिन रोचकरी, नरेश अमृतराव, विशाल रोचकरी, बाळासाहेब भोसले, प्रा. धनंजय लोंढे आदींनी मंदिर संस्थानच्या कारभारावर तीव्र टीका केली. धार्मिक गोष्टींत प्रशासकीय अधिकार्‍यांचा हस्तक्षेप अयोग्य असल्याचे सांगत ‘भाविकांच्या श्रद्धेशी संबंधित निर्णय घेतांना पारदर्शकता ठेवावी’, अशी मागणी करण्यात आली. या संदर्भात तहसीलदार माया माने यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले.

संपादकीय भूमिका

असे आंदोलन करावे लागू नये, यासाठी मंदिरे सरकारीकरणमुक्त होणे आवश्यक आहे !