पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांचा फुकाचा दावा

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे युद्धात वर्चस्व होते. जर आम्हाला वाटले असते, तर आम्ही हे युद्ध चालू ठेवू शकलो असतो; पण युद्धविराम झाल्यामुळे आम्ही ते थांबवले. भारतीय सैनिकी तळ आणि दारूगोळा यांना लक्ष्य केल्यामुळे अंततः पाकिस्तान जिंकला आहे. मला वाटत नाही की, भारत आता हे सहन करू शकेल, असा फुकाचा दावा पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी अमेरिकेची वृत्तवाहिनी ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत केला.
"We could've continued the war!" – boasts 🇵🇰 Pak Info Minister Attaullah Tarar.
Empty words from a nation that's lost 4 wars to 🇮🇳 and was just humiliated in #OperationSindoor 🔥
Looks like Pakistan might get its wish soon… and this time, it could be wiped off the map for… pic.twitter.com/bJqABBsZYC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2025
पहलगामच्या आक्रमणात पाकचा हात नाही
अताउल्ला तरार पुढे म्हणाले की, पहलगाम येथील आक्रमणाच्या घटनेचा संबंध पाकिस्तानशी जोडण्यात भारत पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आमच्या देशात आतंकवाद्यांचे कोणतेही तळ नाहीत; कारण पाकिस्तान स्वतः आतंकवादाचा सर्वांत मोठा बळी आहे. (याहून मोठा विनोद नाही ! जे संपूर्ण जगाला ठाऊक आहे, तरीही ते निर्लज्जपणे नाकारण्याचे काम केवळ पाकिस्तानच करू शकतो ! – संपादक)
(म्हणे) ‘सिंधु जल करार थांबवणे, युद्ध मानले जाईल !’ – पाकचे परराष्ट्रमंत्री

युद्धविरामानंतरही पाकचे परराष्ट्रमंत्री महंमद इशाक डार यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी देतांना म्हटले की, सिंधू जल करार थांबवणे ‘ॲक्ट ऑफ वॉर’ (युद्धाची कृती) समजले जाईल.’ ते एका अमेरिकी वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.
पाककडून २० दिवसांत भारतावर १५ लाख सायबर आक्रमणे
पाकमधील ‘हॅकर्स’कडून (संकेतस्थळांवर नियंत्रण मिळवणारे) २२ एप्रिलपासून आतापर्यंत भारताच्या सरकारी संकेतस्थळांवर १५ लाख सायबर आक्रमणे केल्याची माहिती समोर आली आहे. यांतील केवळ १५० आक्रमणांचा परिणाम झाला, असे सांगण्यात आले आहे. केवळ पाकचे नव्हे, तर बांगलादेश आणि मध्य-पूर्वेकडील इस्लामी देशांतूनही ही आक्रमण करण्यात आली आणि अजूनही करण्यात येत आहेत. यामध्ये एपीटी ३६ (पाकिस्तानस्थित), पाकिस्तान सायबर फोर्स, टीम इन्सेन पीके, मिस्ट्रियस बांगलादेश, इंडो हॅक्स सेक, सायबर ग्रुप एचओएक्स १३३७ आणि नॅशनल सायबर क्रू या सायबर आक्रमण करणार्या गटांचा समावेश आहे.
पाकचे ११ सैनिक ठार
भारताने पाकमध्ये केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकचे ३५ ते ४० सैनिक ठार झाल्याची माहिती भारतीय संरक्षण दलांकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. आता पाकच्या सैन्याने या आक्रमणात त्याचे केवळ ११ सैनिक ठार झाल्याची माहिती दिली आहे. त्याच वेळी पाकमधील दैनिक ‘डॉन’च्या वृत्तानुसार पाकचे ४० सैनिक ठार, तर ७८ सैनिक घायाळ झाल्याचे म्हटले आहे. तसेच १२१ नागरिक घायाळ झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ठार झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्येकी १ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच घायाळांना १० ते २० लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाणार आहे.
पाकिस्तान प्रत्येक वर्षी १० मे या दिवशी उत्सव साजरा करणार
भारतावर कथित विजय मिळवल्यानिमित्त पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्येक वर्षी १० मे या दिवशी उत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. भारताच्या विरोधात राबवलेल्या कारवाईवरून त्यांनी ही घोषणा केली.
पाकला शस्त्र पाठवल्याचे वृत्त खोटे ! – चीनचा दावा
चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनन पाकला मालवाहू नौकेद्वारे शस्त्रे पाठवल्याचे वृत्त पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. इंटरनेट कायद्याच्या वर नाही. जो कुणी सैन्याशी संबंधित अफवा पसरवेल, त्याला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
चीनने कितीही दावा केला, तरी ‘स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट’च्या अहवालानुसार वर्ष २०२० ते २०२४ या काळात पाकने खरेदी केलेल्या शस्त्रांपैकी ८१ टक्के शस्त्रे चीनमधून आली आहेत. चीनने पाकिस्तानला लढाऊ विमाने, रडार, युद्धनौका, पाणबुड्या आणि क्षेपणास्त्रे विकली आहेत.
संपादकीय भूमिका
|

‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप