शिक्षण संस्थाचालकांनी कर्मचार्याला शाळेतून काढले

अकोला – येथील एका मराठी माध्यमाच्या शाळेतील कर्मचारी हेमंत विठ्ठल चांदेकर (वय ४३ वर्षे) याने १० विद्यार्थिनींचा विनयभंग केला. या प्रकरणी जिल्हा आणि महिला बालविकास अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत ‘चाइल्ड हेल्पलाइन’च्या महिला समन्वयकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. शाळेतील काही शिक्षिका प्रशिक्षणासाठी ५ मार्चपासून बाहेरगावी गेल्या होत्या. त्यामुळे शाळेचे दायित्व पुरुष कर्मचार्याकडे होते. या स्थितीचा अपलाभ घेत आरोपीने इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिक्षण घेणार्या १० विद्यार्थिनींचा विनयभंग केला. शिक्षिका प्रशिक्षण घेऊन शाळेत परतल्यानंतर काही विद्यार्थिनींनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. या प्रकरणी त्याला शिक्षण संस्थाचालकांनी ८ मार्चपासून शाळेतून काढून टाकले. आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध शालेय कर्मचारी असणे, हा शैक्षणिक क्षेत्राला लागलेला कलंकच आहे. अशा वासनांधांना तात्काळ कारागृहात टाकले जावे ! |