
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजप
माझे शारीरिक त्रास वाढल्यामुळे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला पुढील शृंखला नामजप सांगितला होता.
श्री दुर्गादेव्यै नमः ।
ॐ नमो भगवते वासुदेवाय ।
श्री हनुमते नमः ।
ॐ नमः शिवाय ।
ॐ नमः शिवाय ।
२. परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करणे
‘एके दिवशी मी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमात पूर्वी परात्पर गुरु (कै.) पांडे महाराज रहात असलेल्या खोलीत बसून नामजप करत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातील चैतन्य माझ्या सहस्रारचक्रातून पूर्ण शरिरात जात आहे’, असा भाव ठेवून मी नामजप करत होते. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.
अ. ‘दुर्गादेवीची शस्त्रे (तलवार आणि त्रिशूळ) वेगाने माझ्या दिशेने येऊन माझ्या देहाभोवती फिरून माझ्या देहावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट करत आहेत.
आ. श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र डोक्यावर फिरत आहे आणि त्यातून पिवळा प्रकाश सहस्रारचक्रातून शरिरात जात आहे.
इ. मारुतिराया माझ्या आज्ञाचक्रावर गदा धरून उभा आहे आणि तेथील आवरण नष्ट होत आहे.
ई. शंकराने त्याचा त्रिशूळ माझ्या मागच्या बाजूला भूमीत उभा केला आहे आणि तो माझ्या पाठीच्या मागून माझ्या शरिराला चैतन्य पुरवत आहे.’
हे सर्व दृश्य मला ३ ते ४ मिनिटे दिसत होते. माझा नामजप भावपूर्ण होऊन मला पुष्कळ हलके वाटत होते.
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, केवळ आपल्या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली. यासाठी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती प्रतिभा किशोर पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.६.२०२४)
|