समर्पित भावनेने काम करा आणि अन्यायाचा एकजुटीने प्रतिकार करा ! – प्रा. डॉ. रूपा शहा

महिलादिनाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवर

कोल्हापूर – ‘एस्.टी.’मध्ये अधिकारी, चालक, वाहक, साहाय्यक म्हणून काम करतांना समर्पित भावनेने काम करावे, तसेच कुणी कोणाही महिलेशी गैरप्रकार करतांना आढळल्यास त्याला एकजुटीने प्रतिकार करावा, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा. डॉ. रूपा शहा यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा प्रा. डॉ. रूपा शहा, तसेच ‘सी.ए.पी.एफ्.’च्या ‘असिस्टंट कमांडर’ प्रणाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहाने साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती स्वाती कापसे यांनी केले. कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधीक्षक अतुल मोरे, कर्मचारी वर्ग, अधिकारी श्रीमती गीतांजली सूर्यवंशी, सुरक्षा, दक्षता अधिकारी भानुदास मदने, तसेच कार्यालयातील सर्व महिलांची उपस्थिती होती.